हॉरर सिनेमामध्ये काम करणार नाही – टायगर

बॉलिवूडचा ऍक्‍शन हिरो टायगर श्रॉफला हॉरर सिनेमांची खूप भीती वाटते. या सिनेमांना तो इतका घाबरतो की अशा कोणत्याही सिनेमांमध्ये कामच न करण्याचे त्याने ठरवून टाकले आहे. टायगर सध्या “बागी 2′ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याच प्रमोशन दरम्यान एका इंटरव्ह्यू दरम्यान टायगरने आपल्याला हॉरर सिनेमांची भीती वाटत असल्याचे सांगितले. यापूर्वी जेंव्हा जेंव्हा हॉरर सिनेमा बघितला तेंव्हा दुसऱ्या दिवशी आपला शांतपणे झोपच लागली नाही, असे टायगरने सांगितले.

हॉरर सिनेमा बघितल्यावर एकट्याला कोठेही जायचीही भीती वाटते. झोपही लागत नाही, असे तो म्हणाला. त्याच्यासारख्या तरण्याबांड हिरोने अशा प्रकारे स्वतःचा कमकुवतपणा उघड करून सांगणे म्हणजे थोडे विचित्र वाटू शकते. मात्र आहे ते आहे. त्यामध्ये काही बदल तर केला जाऊ शकत नाही. “बागी 2’मध्ये टायगर आणि दिशा पटणी ही रियल लाईफ जोडी पहिल्यांदाच पडद्यावरही एकत्र दिसणार आहे. या दोघांशिवाय मनोज वाजपेयी, दीपक डोबरियाल, रणदीप हुडा आणि प्रतिक बब्बर हे कलाकारही बरोबर आहेत. यातील 7 गाण्यांना 7 वेगवेगळ्या संगीतकारांनी संगीत दिले आहे, हे आणखी एक विशेष.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)