हॉटेल व्यावसायिकांनी एकत्र येण्याची गरज

पिरंगुट-हॉटेल्स आणि रेस्टॉरंटना विविध करांच्या कात्रीतही अडकावे लागते, तर रस्त्यावरील फेरीवाल्यांना कोणताच कर भरावा लागत नाही. शिवाय रस्त्यावरील फेरीवाल्यांकडील खाद्यपदार्थ, वीज, पाणी, जागा या सर्वच गोष्टी अनधिकृत, बेकायदेशीर आणि हानीकारक असतात. मात्र बऱ्याच वेळा शासन या मुद्‌द्‌यांकडे कानाडोळा करते. हॉटेलबाबतचे प्रश्न सोडवायचे असतील तर सर्व हॉटेल व्यवसायिकांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पुणे रेस्टॉरंट ऍन्ड हॉटेलिअर्स असोसिएशन (प्राहा)चे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी केले.
भूगाव (ता. मुळशी) येथे मुळशी तालुका रेस्टॉरंट ऍन्ड बार व बिअर शॉपी असोशिएशनच्या मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र लिकर असोसिएशनचे अध्यक्ष सुदीप मोरे, सचिव किशोर सरपोतदार, महेंद्र नागपुरे, बाळासाहेब सणस, सुनिल वाडकर, अजित इंगवले, कालिदास गोपालघरे, संतोष शिंदे, मुळशी असोशिएशनचे अध्यक्ष माऊली सातपुते, उपाध्यक्ष अतुल इंगवले, सचिव सुभाष जगताप, बिअर शॉपी संघटनेचे सचिव संजय सातपुते, तुषार अमराळे, संदीप चोरघे व सर्व पदाधिकारी तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी हॉटेल व्यवसायातील येणाऱ्या अडचणी, परवाना शुल्क, बदलते नियम व सरकारी गोष्टीत येणाऱ्या अनेक प्रश्नांवर किशोर सरपोतदार व गणेश शेट्टी यांनी मार्गदर्शन केले. महामार्गावरील दारुबंदी, जीएसटी, हॉटेल बंद करण्याबाबतची वेळ, पोलीस व प्रशानाकडे असलेले प्रश्न, अग्निसुरक्षा, अन्न व औषध प्रशासनाकडून होणाऱ्या तपासणीची गरज, बदलते नियम व अटी, याबाबत होणारे दंड व निर्णय अशा अनेक गोष्टींबाबत दीर्घ चर्चा झाली.

  • प्लॅस्टिकवर पर्याय व्तरीत आणावा
    हॉटेलमध्ये येऊन बरेचसे लोकांचा पार्सल घेऊन जाण्यावर भर असतो. सरकारने प्लॅस्टिकवर बंदी आणल्यामुळे पातळ, ग्रेव्हीसारखे पदार्थ कशात द्यावे हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. हॉटेल व्यवसायात प्लॅस्टिकवर बंदी उठवावी अथवा प्लॅस्टिकवर पर्याय बाजारात आणूनच त्यावर बंदी घालावी.
    -माऊली सातपुते, अध्यक्ष, मुळशी तालुका रेस्टॉरंट बार असोसिएशन

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)