हॉटेल व्यवसायाच्या आमिषाने गंडा

पिंपरी – हॉटेल व्यवसायात जास्तीचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका तरुणाची एक लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळे सौदागर येथील जाफर फकीर सय्यद यांनी एक जाहिरात वाचुन अरुण वेदप्रकार मल्होत्रा (रा. कोरेगाव पार्क, पुणे) यांना फोन केला. व मल्होत्रा यांची भेट घेतली. तेव्हा मल्होत्रा यांनी भागीदारीमध्ये हॉटेल व्यवसाय करु असे सांगितले. त्यांनतर 22 जुलै 2018 ते 4 ऑगष्ट 2018 या कालावधीत सय्यद यांच्याकडून जास्त नफ्याचे आमिष दाखवून 1 लाख रुपये घेतले. त्यानंतर हॉटेल व्यवसाय न करता सय्यद यांच्याकडून घेतलेले पैसे परत करण्यास टाळाटाळ केली. याबाबत मल्होत्रावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)