हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्याची तीन लाखाची फसवणूक

पुणे – हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्याची एकाने नोकरीचे आमिष दाखवून 3 लाख 9 हजार 315 रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी चिन्मय देशमुख (22, रा. कसबा पेठ) याला फेसबुक वेबसाईटवर हॉटेल मॅनेजमेंट जॉब्स ग्रुपवर हॉटेल मॅनेजमेंटची जागा असल्याची जाहिरात दिसली होती. त्यानुसार संबंधीत व्यक्तीबरोबर संपर्क साधला असता त्याने मलेशिया येथे नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. यानंतर वेगवेगळ्या कारणांसाठी 3 लाख 9 हजार 315 रुपये ऑनलाइन पद्धत्तीने घेतले. यानंतरही नोकरी न लावल्याने फिर्यादीने फसवणूकीची तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक आर. बी. चव्हाण तपास करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)