“हॉटेल आराम’, “पिंजरा’ची 26/11 तील हुतात्म्यांना अनोखी श्रद्धांजली

वेळे ः कला केंद्रात सुरु असलेल्या शिबिराचे उद्‌घाटन करताना शहीद अंबादास पवार यांच्या मातोश्री कमल पवार.

दहा वर्षांपासून परिसरातील लोकांसाठी सर्वरोग निदान शिबिर
कवठे, दि. 26 (प्रतिनिधी) – मुंबई येथे 26/11 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सातारा जिल्ह्यातील जवानही हुतात्मा झाले होते. या घटनेला आज दहा वर्षे पूर्ण झाली. या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना जिल्ह्यात विविध ठिकाणी अभिवादन करुन 26 नोव्हेंबर हा दिवस शहीद स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. 26/11 पासून आजपर्यंत वाई तालुक्‍यातील वेळे येथील हॉटेल आराम आणि पिंजरा सांस्कृतिक कला केंद्रातर्फे विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली स्मृतिदिनी लोकसेवेसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. खऱ्या अर्थाने हीच या हुतात्मा जवानांसाठी खरी श्रद्धाजली ठरत आहे.
गेले दहा वर्षे सातत्याने 26/11 च्या स्मृतीदिनी येथे सर्व रोग निदान शिबिरांचे आयोजन केले जाते. यंदाच्या स्मृतीदिनी कवठे येथे शहीद अंबादास पवार यांच्या घरी भुईंज पोलीस स्टेशनचे स.पो. नि. बाळासाहेब भरणे व कवठे येथील मान्यवरांच्या हस्ते अंबादास पवार यांच्या प्रतिमेचे पूजन व उपस्थित कवठे ग्रामस्थांनी मेणबत्ती लावून प्रतिमेचे पूजन केले. वेळे येथे शहीद अंबादास पवार यांच्या मातोश्री कमल पवार यांच्या हस्ते सर्व रोग निदान शिबिराचे उद्‌घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी वाई पंचायत समितीचे माजी सभापती महादेव मसकर, उपसभापती अनिल जगताप, डॉ. विक्रम मेणबुधले, डॉ. दीप्ती फरगडे, वेळे गावचे सरपंच रफिक इनामदार, माजी सरपंच दशरथ पवार, विजय यादव उपस्थित होते. परिसरातील गावातील रुग्ण प्रतिवर्षी या सर्वरोग निदान शिबिराचा लाभ घेत असतात.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)