हॉटेल्स, मॉल व्यवस्थापक आता पोलिसांच्या रडारवर

पार्किंग सुविधेअभावी ग्राहकांची वाहने रस्त्यांवरच


कायदेशीर कारवाईचा वाहतूक पोलिसांचा इशारा

पुणे – ग्राहकांची आणि पर्यायाने वाहनांची संख्या मोठी असल्याने मॉल, हॉटेल्सबाहेर वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागतात. मात्र, आता याला लगाम बसणार असून हॉटेल्स, मॉल्सच्या चुकीमुळे गंभीर समस्या निर्माण झाल्यास संबंधितांना जबाबदार धरुन कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

शहरात मोठ-मोठे मॉल्स, हॉटेल्स, मंगल कार्यालयांची संख्या लक्षणीय आहे. मात्र, बहुतांश मॉल, हॉटेल्स यांना स्वतःची पार्किंग उपलब्ध नाही. ज्यांना आहे, ती अपुरी असल्याने ग्राहक मंडळी रस्त्यांवरच वाहने लावतात. परिणामी, वाहतूक कोंडी होऊन रस्ते जाम होतात. यामुळे अनेकदा अॅम्बुलन्ससारख्या वाहनांना रस्ता मिळणेही कठीण होते. यामुळे जीवितहानी होण्याची शक्‍यता असते. ही बाब वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आली असून शहरातील काही प्रमुख मॉल, हॉटेल, मंगल कार्यालय मालकांसोबत शनिवार (दि.17) रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत संबंधितांना सूचना देण्यात आली असून पार्किंगची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, आपल्याकडे आलेल्या नागरिकांना इतरत्र वाहने लावण्यापासून मज्जाव करणे. यासाठी कार्यालयाबाहेर आवश्‍यक तेवढ्या प्रमाणात वॉर्डनची नेमणूक करण्याचेही सांगण्यात आले आहे. या सूचनांचे पालन न झाल्यास आणि वाहतूक कोंडी होऊन गंभीर समस्या निर्माण झाल्यास संबधितांना जबाबदार धरुन कायदेशीर कारवाई करणार असल्याचे वाहतूक पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.

-Ads-

शाळा, महाविद्यालये, क्‍लासेसलाही सूचना
शहरात शाळा, महाविद्यालये, खासगी क्‍लासेसची संख्या मोठी असून त्यांना पुरेशी पार्किंग उपलब्ध नाही. वाहतूक पोलिसांनी यापूर्वी अशा शाळा, क्‍लासेस चालकांना सूचना दिल्या असून पार्किंगची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, गेटवर वॉर्डन, स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यास सांगण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)