हॉटेलवर बेकायदा हुक्का विक्री प्रकरणी कारवाई

पुणे,दि.1- कोरेगाव पार्क येथील हॉटेल ग्रीन व्हिलावर बेकायदा हुक्का विकल्याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी कारवाई केली आहे.
हॉटेल मालक हमजा रंगूनी व व्यवस्थापक अमोलचंद धुपे याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरेगाव पार्क पोलिसांनी छापा टाकला तेव्हा हॉटेलमध्ये 23 तरुण-तरुणी हुक्का पाईपव्दारे हुक्का पिताना आढळले. हॉटेलची तपासणी केली असता पत्र्याच्या शेडमध्ये ग्राहकांना बेकायदेशीर, बिगर परवाना हुक्का ओढण्यासाठी हुक्का फ्लेवर व त्याचे साहित्य कामगार पुरवत होते. लोखंडी शेगडीमध्ये कोळसा पेटवून पेटता निखारा पुरेशी काळजी न घेता ग्राहकांपर्यंत पोहचवला जात होता. हॉटेलला आग लागल्यास आग विझविण्यासाठी कोणतीही यंत्रणा नव्हती. तसेच हॉटेल कस्तूरबा गांधी माध्यमिक महाविद्यालयापासून फक्त 50 फुटाच्या अंतरावर आहे.सिगरेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त बच्चनसिंग व सहायक पोलीस आयुक्त जयश्री गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बहाद्दरपुरे, पोलीस उपनिरीक्षक निखील पवार, सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश लंघे, शरद कणसे व कर्मचारी रमजान शेख, सागर जगताप, अमोल जाधव, संदिप गायकवाड, सुनिल कुसाळकर, महादेव धांडे, गणेश हांडगर, योगेश शिवले यांच्या पथकाने केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)