हॉटेलवर छापा टाकून राहुरीतील 16 जुगारी ताब्यात

राहुरी विद्यापीठ – शहरातील नगर मनमाड राज्य महामार्गावरील एका हॉटेलमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी अहमदनगर व राहुरीतील पोलीस पथकासह दुपारी चार वाजेदरम्यान छापा मारून सुमारे 16 जुगाऱ्यांना अटक करुन त्यांच्याकडून लाखों रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. या कारवाईने हॉटेल व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
शहरातील पाण्याच्या टाकी परिसरातील एका हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात जुगार अड्डा चालू असल्याची गुप्त खबर पोलिसांना मिळाली.त्यानूसार त्यांनी अहमदनगर येथील हवालदार योगेश भिंगारदिवे, छबू कोतकर, सुनिल निभवणकर, साबीर शेख, धिरज अभंग, कपिल गायकवाड, संदिप आव्हाड, सुनिल पोपळघट, रिजवान शेख, व्हि. डी. पवार, बोराटे यांचे पथक तयार करून राहुरी पोलीस ठाण्यातील पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, उपपोलिस निरीक्षक सतिष शिरसाठ, हवालदार गुलाब मोरे, महेंद्र गुंजाळ, शिवाजी खरात, नारायण ढाकणे, महेश भवार, वैभव पांढरे, रोहित यमूल, संजय राठोड, अयुब शेख, सुनिल कुटे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय जाधव, चालक बोडखे यांना बरोबर घेऊन आज (दि.10) रोजी सायंकाळी चार वाजे दरम्यान सदर हॉटेलवर अचानक छापा मारला. यावेळी तालुक्‍यातील एकूण 16 जुगाऱ्यांना अटक केली असून रोख रक्कम, सात दुचाकी वाहने व जुगार खेळण्याचे साहित्य असा लाखो रूपयांचा मुद्देमाल पोलीस पथकाने ताब्यात घेतला आहे. यावेळी दोन तीन जुगारी संधीचा फायदा घेऊन दुसऱ्या मजल्यावरून उड्या मारून पसार झाले.
या कारवाईत जुगार खेळणारे जयहिंद माळी (रा.राहुरी) बापू गुलदगड (रा.तनपूरे गल्ली, राहुरी), अण्णासाहेब कराड, मनोज राजू आहेर, चॉद इमाम शेख, रविंद्र गोविंद पाठक, राजेश दिलीप शिरसाठ आदींसह सुमारे 16 जुगाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)