हॉटेलमधील सहकारी महिला कामगाराचा खून करणाऱ्याला पोलीस कोठडी

मोबाईल क्रमांक न दिल्याने धारदार शस्त्राने वार करून केला होता खून
पुणे, दि. 28 (प्रतिनिधी) – हॉटेलमधील महिला कामगाराने मोबाईल क्रमांक देण्यास क्रमांक देण्यास नकार दिल्याने तिचा खून करणाऱ्या सहकारी कामगाराला डेक्कन पोलिसांनी अटक केली. त्याला 4 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
पूर्णो कार्तिक विश्‍वास (वय 32, रा. वडारवाडी, मूळ रा. पश्‍चिम बंगाल) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. मारियाम्मा देवाप्पा सुतार (वय 36, रा. घोले रस्ता) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. घटना रविारी (दि. 28 ऑगस्ट) रात्री पावणेबाराच्या सुमारास घोले रस्त्यावरील जेवण हॉटेल समोर घडली. भैरवनाथ गणतपी पुजारी (वय 28, रा. धनकवडी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. आरोपी पूर्णो आणि मारियाम्मा हे दोघेही हॉटेल जेवण येथे कामाला होते. आरोपी पूर्णो याने मयत मारियम्मा हिला मोबाइल क्रमांक मागितला.
मात्र, मारियाम्मा याने मोबाईल क्रमांक पूर्णो याला दिला नाही. याऊलट त्याची हॉटेल मालकाकडे तक्रार केली होती. त्याचा राग मनात धरून पूर्णो याने धारदार शस्त्राने वार करून मारियम्मा यांचा खून केला. या प्रकरणी पोलिसांनी पूर्णो याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने त्याला 4 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील अनंत चौधरी यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)