हॉटेलच्या टेरेसवरुन उडी मारुन युवकाची आत्महत्या

लोणावळा, (वार्ताहर) – गवळीवाडा नाका येथील स्वास्तिक हॉटेलच्या टेरेसवरुन उडी मारुन एका युवकाने आत्महत्या केली. सोमवारी (दि. 19) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आत्महत्या मागचे नेमके कारण समजू शकले नाही.

अरुण नटवरलाल ठाणवी (वय 33, रा. मारुती टावर परिसर, ठाकूर कॉम्पलेक्‍स मुंबई, कांदिवली ईस्ट) असे तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी हॉटेल व्यावसायिक अब्दुल सुन्नी यांनी फिर्याद दिली आहे. ठाणवी हे सोमवारी स्वास्तिक हॉंटेलच्या रुम नं. 103 मध्ये थांबले होते. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ठाणवी हे हॉटेल बाहेर जेवणासाठी गेले होते. साडेनऊच्या सुमारास पुन्हा हॉटेलमध्ये येत टेरेसवरुन उडी मारुन आत्महत्या केली.

या प्रकरणी लोणावळा शहरचे पोलीस हवालदार बनसोडे तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)