हॉटेलच्या चिमणीतून धुर निघाल्याने ग्राहकांची धावपळ

हॉटेलच्या चिमणीतून धुर निघाल्याने ग्राहकांची धावपळ
– जंगली महाराज रस्त्यावरील शुभम हॉटेल येथील घटना

पुणे,  जंगली महाराज रस्त्यावरील शुभम हॉटेलच्या स्वयंपाक घरातील चिमणीला मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेत आग विझविली. मात्र, मोठ्या प्रमाणात धूर झाल्याने ग्राहकांची धावपळ उडाली होती.

जंगली महाराज रस्त्यावर शुभम हॉटेल आहे. हॉटेलच्या स्वयंपाकघरातील चिमणीतून अचानक मोठ्या प्रमाणात धुर निघाल्याने स्वयंपाकी आणि वेटर यांनी व्यवस्थापनास तातडीने सांगितले. दक्षता म्हणून ग्राहकांना याची कल्पना देण्यात आली. दरम्यान, अग्निशमन दलाला कॉल करण्यात आला. अग्निश स्टेशन ऑफिसर रवींद्र आढाव, तांडेल सितापकर, चालक ईलाई शेख व फायरमन पवार व चौधरी यांनी तातडीने आगीवर नियंत्रण आणले. शुभम हॉटेलवरतीही काही कार्यालये आहेत. यामुळे तातडीने मदत कार्य केल्याने मोठा अनर्थ टळला. यामध्ये हॉटेलचे कोणतेही नुकसान झाले नाही.

* चिमण्यांची सफाई आवश्‍यक
हॉटेलच्या स्वयंपाकघरातील धुर बाहेर जाण्यासाठी चिमणीची गरज असते. हॉटेलची परवानगी घेतानाही ते बंधनकारक केले आहे. मात्र या चिमणीमध्ये मोठ्या प्रमाणात मसाला आणि तेलाचा धुर साचला जातो. त्याची वेळेच सर्व्हिसिंग न केल्यास साचलेल्या तेलाला कधीही आग लागण्याची शक्‍यता असते. यापूर्वीही हॉटेलची चिमणी जळाल्याच्या अनेक घटना शहरात घडल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)