हॉटेलचालकाच्या खुनप्रकरणी महिलेस अटक

 

तेरा दिवसांची कोठडी : अन्य दोनजण फरार

-Ads-

कोरेगाव, (प्रतिनिधी) – मुगाव फाट्यावरील अलंकार हॉटेलचे चालक जोतिराम कदम यांच्या खुनाप्रकरणी पोलिसांनी अक्कलकोट येथील महिलेस अटक केली असून अन्य दोन संशयीत अद्याप पसार आहेत. तिला न्यायालयात हजर केले असता 13 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
याबाबत माहिती अशी, अलंकार हॉटेलचे चालक जोतिराम महादेव कदम हे बेपत्ता असल्याची फिर्याद त्यांची पत्नी संध्या यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात नोंद केली होती. त्यानंतर त्यांची गाडी दि.28 रोजी पाडळी (सातारा रोड) हद्दीत आढळून आली तर दोन दिवसांनी जोतिराम कदम यांचा मृतदेह पाडळी हद्दीत कॅनॉलमध्ये आढळून आला. त्यांचा तिक्ष्ण हत्याराने डाक्‍यात वारकरून खून झाल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले. याप्रकरणी कोरेगाव पोलिस मुख्य संशयीत लक्ष्मीबाई संतोष चव्हाण वय (35) मुगाव फाटा कोरेगाव मूळ रा. कुडल पो. शावळ ता. अक्कलकोट जि. सोलापूर हिचा शोध घेत होते. दि. 6 रोजी लक्ष्मी चव्हाण पुण्याहून कोरेगावला येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून तिला कोरेगाव रेल्वे स्टेशनवर अटक केली. लक्ष्मी चव्हाणने गुन्ह्याची कबुली दिल्याचे समजते. तथापि, या खुनाचे कारण अजूनही गुलदस्त्यातच आहे. तसेच अन्य दोन संशयीत आहेत. संतोष राठोड व आज्या उर्फ सचिन धनगर रा. मुगाव फाटा कोरेगाव, मुळगाव (धरणगाव) अद्यापही फरार आहेत. असून लक्ष्मी चव्हाणला सोमवारी न्यायालयापुढे हजर केले असता दि. 19 ऑगस्ट पर्यंतची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तपास पोलीस निरीक्षक चुडाप्पा करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)