हॉकी विश्‍वचषकामध्ये एस. व्ही. सुनीलचा सहभाग अनिश्‍चीत 

गुडघ्याच्या दुखापतीमुळे संघातून बाहेर 

नवी दिल्ली: नोव्हेंबर महिन्यात सुरु होणाऱ्या हॉकी विश्‍वचषकाआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसण्याची शक्‍यता आहे. संघाच्या आघाडीच्या फळीतला महत्वाचा खेळाडू एस. व्ही. सुनील गुडघ्याच्या दुखापतीमुळे संघात सहभागी होणार नाहीये. 4 ऑक्‍टोबर रोजी भारतीय संघाच्या सराव शिबीरात सुनीलला ही दुखापत झाली असल्याची माहिती मिळाली आहे.

-Ads-

या दुखापतीमधून सावरण्यासाठी सुनीलला 4 आठवड्यांचा कालावधी लागण्याची शक्‍यता आहे. 28 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर दरम्यान ओडीसातील भुवनेश्वर येथे हॉकी विश्‍वचषकाचे आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे सुनीलला झालेली दुखापत पाहता त्याला संघात जागा मिळण्याच्या सर्व शक्‍यता मावळलेल्या दिसत आहेत. पीटीआयशी बोलत असताना, सुनीलने आपल्याला झालेल्या दुखापतीविषयी माहिती दिली. यावेळी बोलताना सुनील म्हणाला की, 4 ऑक्‍टोबर रोजी सरावाच्या वेळी चेंडूवर ताबा मिळविण्या करिता मी उडी घेतल्या नंतर माझ्या गुडघ्याला दुखापत झाली, त्या जखमेची चाचपणी केली असता लेटरल कोलेटरल लिगामेंट इन्ज्युरी असल्याची माहिती मिळाली. मात्र, यावेळी तो म्हणाला की, सहभागी होण्याबाद मी आशावादी असून दुखापत होउन आत्या एक अठवडा उलटला आहे आणि विश्‍वचषकासाठी आणखिन अवधी शिल्लक आहे. तो पर्यंत कदाचीत मी पुर्णपणे बरा होउ शकेल.

सध्या सुनील हॉकी इंडियाच्या अधिकृत डॉक्‍टरांकडून वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी दिल्लीला रवाना झाला आहे. या दुखापतीनंतरही सुनील संघातील सहभागाबद्दल सकारात्मक आहे. माझी दुखापत लवकर बरी झाल्यास मी संघात सहभागी होऊ शकतो, मात्र त्याला झालेली दुखापत पाहता हॉकी इंडिया हा धोका पत्करेल का हा मोठा प्रश्नच आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)