हॉकी विश्‍वचषकातील पाकिस्तानचा सहभाग निश्‍चित

कराची: भुवनेश्वर येथे 28 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर या कालावधीत खेळल्या जाणाऱ्या एफआयएच पुरुष विश्‍वचषक हॉकी स्पर्धेत विश्‍वचषकात 16 संघ सहभागी होत आहेत. मात्र, पाकिस्तान संघाची विश्‍वचषकात सहभागी होण्याबाबदची अनिश्‍चितता अखेर संपुष्टात आली आहे. पाकिस्तानच्या संघाला भारताचा व्हिसा देण्यात आला असून, त्यांच्या विश्‍वचषकातील संघासाठी एक नविन प्रायोजकही त्यांना लाभला आहे.

भारतीय उच्चायुक्तांनी हॉकीपटूंना व्हिसा बहाल केला असून त्यांना लाभलेला नवा प्रायोजक स्पर्धेदरम्यान होणाऱ्या खर्चापोटी त्यांच्या संघाला 90 लाख रुपये देणार आहे. पाक हॉकी महासंघाचे सचिव शाहबाज अहमद यांनी दिलेल्या माहितीनुसार संघाच्या सर्व समस्यांवर तोडगा निघाला. मुख्य कोच तौकिर दार आणि सहायक कोच दानिश कलीम यांना मात्र व्हिसा नाकारण्यात आला. या दोघांचे अर्ज उशिरा जमा झाले होते. भारतीय उच्चायुक्तांनी या दोघांना व्हिसा मिळेल, असे स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)