हॉकी मैदान तीन वर्षांपासून धूळखात

– महापालिकेचे दुर्लक्ष, ठेकेदाराचा गालथानपणा

पिंपरी – स्पाईन रोड, मोशी येथील सेक्‍टर क्रमांक 10 मधील नव्यानेच बांधण्यात आलेले हॉकी मैदान मागील 3 वर्षांपासून वापराविना पडून आहे. मैदानासाठी विविध सुविधा पुरवण्याकडे महापालिकेने कानाडोळा केल्याने खेळाडूही या मैदानाकडे फिरकत नसल्याचे समोर आले आहे.

मोशी येथील सेक्‍टर क्रमांक 10 मध्ये महापालिकेने चांगले खेळाडू घडवण्यासाठी माती असलेले हॉकी मैदान बनवले आहे. यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आला. मात्र या मैदानाचे काम 80 टक्के पुर्ण होऊनही मागच्या 3 वर्षांपासून केवळ 20 टक्के कामासाठी हे मैदान बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मैदानाची दूरावस्था झाली असून मैदानाला घाणीच्या साम्राज्याने वेढले आहे. मैदानावर सर्वत्र गवत, झाडे, झुडपे व घाणेऱ्या उगवल्या आहेत. तसेच मैदानावर सर्वत्र कचरा पडला असून येथे स्वच्छतेची कोणतीही काळजी घेतली जात नाही. त्यामुळे या मैदानाची मोठ्या प्रमाणावर वाताहात झाली आहे. तसेच या मैदानासाठी जोडण्यात आलेल्या विजेच्या खांबाचीही मोडतोड करण्यात आली आहे.

मैदानावर कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने कोट्यावधीची महापालिकेची ही मिळकत बेवारस ठरली आहे. खेळाडूंनी मैदान खुले करण्याची वारंवार मागणी करुनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. महापालिकेने कोट्यावधी रुपये खर्च करुनही मैदान केवळ ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या वेळकाढूपणामुळे मैदान विनावापर पडून असल्याने स्थानिक रहिवासी व खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे. मैदानाचे काम पुर्ण करुन मैदान खेळाडूंसाठी खुले करण्याची मागणी क्रीडा प्रेमींनी केली आहे.

मैदानाला नामफलकच नाही
महापालिकेने कोट्यावधी रुपये खर्च करुन बांधलेल्या या मैदानाच्या प्रवेशद्वारापाशी नामफलक लावणे गरजेचे होत. मात्र महापालिकेने या मैदानाच्या प्रवेशद्वारापाशी नामफलक लावलाच नाही. त्यामुळे हे मैदान नक्की कोणत्या खेळाचे असा प्रश्‍न नागरिकांना पडतो. क्रीडांगणाची इमारत अद्यावत असली तरी कायम बंद असते. तर मैदान एखाद्या पडीक माळरानासारखे दिसत आहे. त्यामुळे महापालिकेने हॉकीसाठी खेळाचे मैदान विकसित केल्याचा महापालिकेला विसर पडला आहे. केवळ महापालिकेच्या निष्क्रीय कारभारामुळे कोट्यावधीची मालमत्ता निरुपयोगी ठरत आहे. एकीकडे खेळासाठी मैदान नसताना दुसरीकडे महापालिकेच्या या अनास्थेबद्दल खेळाडूंनी संताप व्यक्त केला.

खेळाडूंच्या मागण्या
– मैदानाची अपुर्ण कामे पुर्ण करुन मैदान उपयोगात आणावे
– मैदानावर पिण्याच्या पाण्याची सोय करावी
– मैदानाची नियमीत स्वच्छता करण्यात यावी
– मैदानाभोवती वीजेची सोय करावी
– मैदानासमोर व आत नामफलक लावावा
– मैदानावर सुरक्षा रक्षक व स्वच्छता कर्मचारी नेमावेत


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)