हॉकी प्रशिक्षक हरेंद्रसिंग यांची हकालपट्टी

नवी दिल्ली: भुवनेश्वर येथे झालेल्या हॉकी विश्‍वचषकामध्ये भारतीय संघाचे मार्गदर्शक असलेले हरेंद्रसिंग यांची प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. हॉकी इंडियाने सीनियर संघाचे प्रशिक्षक म्हणून त्यांना हटवले असले तरी त्यांच्यावर ज्युनियर संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात झालेल्या कामगिरीच्या आधारावर हरेंद्रसिंग यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

हॉकी इंडियाने आपल्या पत्रकात म्हटले आहे की, 2018 हे वर्ष भारतीय हॉकी संघासाठी निराशाजनक होते आणि ज्या अपेक्षा हॉकी संघाकडून केल्या गेल्या होत्या, त्यांची पूर्ती या वर्षात झाली नाही. तरीही हॉकी इंडियाने ज्युनियर हॉकीत अधिक लक्ष घालणे आवश्‍यक असल्याचे लक्षात घेऊन पुढील पावले टाकण्याचे ठरविले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गोल्ड कोस्ट, ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय संघाला हात हलवत परत यावे लागल्यानंतर ज्युनियर संघाचे प्रशिक्षक असलेले हरेंद्र सिंग यांच्याकडे सीनियर संघाची जबाबदारी सोपविण्यात आली. पण ते संघाच्या कामगिरीत फरक पाडू शकले नाहीत. किंबहुना, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आशियाई क्रीडा स्पर्धेत गतविजेत्या भारताला ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले. वर्ल्डकपमध्ये तर भारतीय संघ उपांत्यपूर्व फेरीतच गारद झाला.

हॉकी इंडियाने नव्या प्रशिक्षकासंदर्भात म्हटले आहे की, नव्या प्रशिक्षकासाठी हॉकी इंडिया लवकरच अर्ज मागवणार आहे. फेब्रुवारीत भारतीय सीनियर संघ सुलतान अझलन शहा हॉकीसाठी शिबिरात एकत्र येईल. 23 मार्चपासून ही स्पर्धा रंगणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)