हॉकी कसोटी मालिका : भारतीय महिलांनी स्पेनला 1-1ने बरोबरीत रोखले 

पाच सामन्यांची हॉकी कसोटी मालिका 

माद्रिद – पहिल्या सामन्यात एकतर्फी पराभव पत्करणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात बलाढ्य स्पेनला 1-1 असे बरोबरीत रोखताना चमकदार कामगिरी बजावली. मात्र पहिला सामना 3-0 असा जिंकणाऱ्या स्पेनच्या महिला हॉकी संघाने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन सामन्यांनंतर 1-0 अशी आघाडी कायम राखली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्पेनच्या महिला संघाने दुसऱ्या सामन्यातील पहिल्या दोन सत्रांमध्ये आपले वर्चस्व कायम राखताना सलग दुसऱ्या विजयासाठी पायाभरणी केली होती. मात्र नंतरच्या दोन्ही सत्रांमध्ये जोरदार झुंज देणाऱ्या भारतीय महिला संघाने ही लढत बरोबरीत सोडविताना चुकांमधून शिकत असल्याचे दाखवून दिले. पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. परंतु स्पेनच्या बेर्टा बोनास्ट्रेने सामन्याच्या 14व्या मिनिटाला पहिला गोल करताना आपल्या संघाला 1-0 असे आघाडीवर नेले.

पिछाडीवर पडलेल्या भारतीय महिला संघाने दुसऱ्या सत्रात प्रतिआक्रमण करताना गोल करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र स्पेनची गोलरक्षक मारिया रुईझला चकविणे त्यांना जमले नाही. त्यामुले स्पेनने मध्यंतराला 1-0 अशी आघाडी कायम राखली. तिसऱ्या सत्रात भारताच्या बचावपटूंनाही सूर गवसला. त्यामुळे स्पेनच्या आक्रमकांना गोलपासून दूर ठेवण्यात भारतीय महिलांना यश आले. चौथ्या सत्रात भारतीय आक्रमणाचा वेग वाढल्याचे दिसून आले आणि 54व्या मिनिटाला त्याचे फळही मिळाले. अनुपा बार्लाच्या डिफ्लेक्‍शनवर चेंडू रोखण्यात मारिया रुईझ अपयशी ठरली आणि भारतीय महिलांनी बरोबरी साधली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)