लोणी काळभोर- ओम एज्युकेशन सोसायटीच्या उरुळी कांचन (ता. हवेली) येथील एंजल्स हायस्कूलने पुणे जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या जिल्हा पातळीवरील आंतरशालेय क्रिकेट आणि हॉकीच्या स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. या संदर्भात अधिक माहिती देताना संस्थेचे संस्थापक ओमप्रकाश शर्मा म्हणाले की, नुकत्याच झालेल्या नेहरू हॉकी स्पर्धेत 17 वर्षांखालील मुले आणि मुली या दोन्ही संघांनी जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक पटकाविला, तर 15 वर्षांखालील मुलांनी द्वितीय क्रमांक मिळवून विभागीय स्तरावर प्रवेश मिळवला. आंतरशालेय हॉकी स्पर्धेत 14 आणि 17 वर्षाखालील मुली अशा दोन्ही संघांनी प्रथम क्रमांक मिळवला. 14 वर्षाखालील मुलांनी तृतीय क्रमांक, तर 17 वर्षाखालील मुलांनी द्वितीय क्रमांक मिळवून विभागीय स्तरावर प्रवेश मिळवला आहे, तसेच दौंड येथे पार पडलेल्या आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत एंजल्स हायस्कूल, उरुळी कांचन या संघाने न्यू इंग्लिश मीडिय स्कूल, लांडेवाडीचा अंतिम सामन्यात 9 गडी राखून पराभव केला. संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश शर्मा, प्राचार्या भारती आंबुरे यांनी खेळाडू तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक रवींद्रन त्यागराजन, भगवान गिरमे, आरती काणसे, विशाल काळभोर यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)