हॉकर्स झोन निश्‍चितीचे काम प्राधान्याने पूर्ण करणार – आयुक्‍त

  • शहर फेरीवाला समितीची बैठक ः सुनियोजनासाठी कार्यशाळा घेणार

पिंपरी, (वार्ताहर) – पिंपरी चिंचवड मनपाद्वारक स्थापित शहर फेरीवाला समितिची बैठक मनपा स्थायी समिती सभागृहात पार पडली. या बैठकीत काही सकारात्मक निर्णय घेण्यात आले असल्याचे महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी सांगितले.

बैठकीच्य अध्यक्षस्थानी मनपा आयुक्‍त श्रावण हर्डीकर, अतिरिक्‍त आयुक्‍त प्रवीण आष्टीकर, सहाय्यक आयुक्‍त विजय खोराटे, वाहतूक पोलीस निरीक्षक विवेकानंद वाखारे, नवनगर विकास प्राधिकरणांचे उपकार्यकारी प्रकाश अहिरराव , महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, समिती सदस्य राजेंद्र वाघचौरे, विजय शहापुरकर, दामोदर मांजरे, प्रवीण कांबळे, डॉ सरोज अंबिके, कविता खराडे, सविता सोनवणे, संतोष जाधव व सर्व क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्व सदस्यांनी आपआपली मते मांडली.

मनपा आयुक्‍त व समितीचे अध्यक्ष श्रावण हर्डीकर यांनी हॉकर्स झोन साठी उपसमिती स्थापन करून त्याद्वारे काम करून 100 % हॉकर्स जागेमध्ये 50% हॉकर्स झोन आणि 50% पार्किंग करावी. पार्किंगची व्यवस्था केल्याशिवाय खरेदी विक्री करू नये. फेरीवाला कायद्याबाबत जनजागृती व माहिती व्हावी याबाबत एक कार्यशाळा आयोजित करून प्रबोधन करण्यात येईल, असे काही सकारात्मक निर्णय घेतले. तसेच फ़ेरीवाल्यांना स्वछतेबाबत जागरूक राहून सहकार्य करावे, झोनच्या ठिकाणी पाणपोईची सोय करावी असे आदेश दिले.

या वेळी नखाते म्हणाले, सध्याचे नोंदणीकृत फेरीवाले व नवीन आलेले फेरीवाले याबाबत काय-काय करता येईल यावर चर्चा झाली. मनपाचे यादीतून स्पष्ट झाले आहेत त्या अपात्र लोकांना पात्र करण्याची संधी द्यावी व बाटोमॅट्रिक सर्वेक्षणात राहिलेले सर्वेक्षण करावे. पात्र विक्रेत्यांवर कारवाई करू नये, प्रस्तावित हॉकर्स झोनमध्ये लाईट, पाणी, स्वच्छतागृह, निवारा आदी सोई कराव्यात व हॉकर्स झोनसाठी स्वतंत्र कार्यालय व कर्मचारी नेमणूक करावी, अशा सूचना मांडल्या.
पिंपरी :शहर फेरीवाला समितिच्या बैठकीत उपस्थित मनपा वरिष्ठ अधिकारी आणि समितीचे सदस्य.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)