हॉंगकॉंग ओपन बॅडमिंटन स्पर्धा: किदंबी श्रीकांतचा संघर्षपूर्ण विजय 

कोवलून (हॉंगकॉंग): भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतने स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला असून त्याने उप-उपांत्यपूर्व फेरीत भारताच्याच एच एस प्रणॉयला 18-21, 30-29, 21-18 असे पराभूत केले. तर, भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा पहिल्याच फेरीत पराभव झाला आहे. सायनाचा जापानच्या अकेना यामागुचीने संघर्षपूर्ण पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली आहे.

यावेळी, पुरुष एकेरीच्या सामन्यातील श्रीकांत आणि प्रणॉय यांच्या सामन्यातील पहिल्या सेटमध्ये प्रणोयने सुरूवातीपासूनच आघाडी घेतली होती. त्यामुळे श्रीकांतवर दडपण आले आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत प्रणॉयने हा सेट 18-21 अश्‍या फरकाने आपल्या नावे केला. त्यामुळे पहिला सेट श्रीकांतला थोडक्‍यात गमवावा लागला. मात्र, त्याने पिछाडीवरुन चांगलीच झुंज दिली. पण केवळ तीन गुणांच्या फरकाने गेम प्रणॉयच्या नावावर झाला.

-Ads-

तर, दुसऱ्या सेटमध्ये कमालीची चुरस पाहायला मिळाली. या सेट मध्ये प्रणॉय आणि श्रीकांतयांनी मोठ्या रॅलीज खेळल्या यात कधी श्रीकांत आघाडी घेत होता तर कधी प्रणॉय आघाडीवर होता. मात्र, अखेर 30-29 अशा गुणसंख्येवर श्रीकांतने तो गेम जिंकला आणि सामन्यात बरोबरी राखली. तर, तिसरा गेमदेखील अटीतटीचा झाला. या गेममध्ये दुसऱ्या गेम मधिल विजयामुळे आत्मविश्‍वास उंचावलेल्या श्रीकांतने आघाडी घेतली. आणि तिसरा सेट 21-18 अश्‍या फरकाने आपल्यानावे करत उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

तत्पूर्वी, भारताची फुलराणी सायना नेहवाल हिला सलमीच्याच सामन्यात आपला गाशा गुंडाळावा लागला. सायनाचा जपानच्या अकाने यामागूची 21-10, 10-21, 19-21 असे पराभूत करत विजयी आगेकूच केली. यावेळी पहिल्या सेटमध्ये यामागूचीने सायनाला चुका करायला भाग पाडत आघाडी घेतली होती. सुरुवातीलाच पिछाडीवर पडल्यामुळे सायना ने दबावात खेळ केला. त्याचा फायदा घेत यामागूचीने पहिला सेट 21-10 अश्‍या फरकाने आपल्या नावे केला. तर, दुसऱ्या सेत मध्ये सायनाने आपल्या पहिल्या सेट मधिल चुका टाळत चांगला खेळ केला. त्यामुळे दुसऱ्या सेट मध्ये तिच्यावर दबाव जाणवला नाही. आणि तिने दुसरा सेट 10-21 अश्‍या फरकाने जिंकला त्यामुळे सायना आणि यामागुची मध्ये 1-1 अशी बरोबरी झाली. त्यानंतर तिसऱ्या सेट मध्ये यामागुचीने पुन्हा सामन्यात पुनरागमन करत सायनावर दबाव टाकला मात्र सायनानेही सामन्यात प्रतिकार करत यामागुचीला चांगलेच झुंजवले. मात्र तिसरा सेट यामागुचीने 19-21 असा जिंकत सायनाचा पराभव केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)