हैदराबाद सनरायजर्स संघाचा निर्णय; डेव्हिड वॉर्नरच्या जागी केन विल्यमसन कर्णधार

नवी दिल्ली – दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यादरम्यान घडलेल्या अत्यंत धक्‍कादायक अशा “बॉल टॅम्परिंग’ प्रकरणी राजीनामा दिलेल्या डेव्हिड वॉर्नरच्या जागी न्यूझीलंडच्या केन विल्यमसनकडे हैदराबाद सनरायजर्स संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. आज हा निर्णय जाहीर करताना हैदराबाद सनरायजर्स संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. शण्मुगम यांनी सांगितले की, बॉल टॅम्परिंग प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असलेल्या वॉर्नरऐवजी विल्यमसनकडे सूत्रे सोपविताना आम्हाला आनंद होत आहे.

हैदराबादच्या कर्णधारपदासाठी शिखर धवनचेही नाव चर्चेत होते. परंतु विल्यमसनकडे नेतृत्व गेल्यामुळे आयपीएलमधील आठपैकी केवळ एका संघाचे कर्णधारपद परदेशी खेळाडूकडे गेले असून बाकी सात संघांचे कर्णधार भारतीय आहेत. मात्र विल्यमसन सध्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत व्यस्त असून ती मालिका संपल्यावरच तो हैदराबादच्या संघात सामील होऊ शकणार आहे.

हे सर्व प्रकरण उघडकीला आल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ व उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांना एका वर्षासाठी निलंबित करण्याचा निर्णय क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केला. त्यानंतर यंदाच्या आयपीएलमधून या दोघांना निलंबित करण्याचा निर्णय बीसीसीआयनेही जाहीर केला होता. आयपीएलच्या नव्या मोसमात स्टीव्हन स्मिथ राजस्थान रॉयल्स संघाचे, तसेच डेव्हिड वॉर्नर सनरायजर्स हैदराबादचे नेतृत्व करणार होता. मात्र या दोघांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राजस्थान रॉयल्स संघाने स्टीव्हन स्मिथच्या जागी आपल्या संघाचे नेतृत्व अजिंक्‍य रहाणेकडे सोपविण्यात आल्याचे जाहीर केले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)