हैदराबाद येथील मक्का मशिद स्फोट प्रकरणातील आरोपी निर्दोष

संग्रहित चहाचित्र

स्वामी असिमानंद यांच्यासह पाच जणांची सुटका
हैदराबाद – येथील प्रख्यात मक्का मशिदीत अकरावर्षांपुर्वी झालेल्या बॉंम्ब स्फोटाच्या प्रकरणातून एनआयए कोर्टाने यातील पाचही आरोपींची निर्दोष सुटका केली आहे. स्वामी असिमानंद यांच्या सह एकूण पाच जण यात आरोपी होते. देवेंद्र गुप्ता, लोकेश शर्मा, भारत रतेश्‍वर आणि राजेंद चौधरी अशी निर्दोष सुटका झालेल्या अन्य चार आरोपींची नावे आहेत. या आरोपींच्या विरोधात कोणताच पुरावा उपलब्ध नसल्याने त्यांची सुटका करण्यात आल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. या स्फोटात नऊ जण ठार तर 58 जण जखमी झाले होते.

या प्रकरणात तपास अधिकाऱ्यांनी एकूण दहा जणांवर गुन्हे दाखल केले होते पण प्रत्यक्षात पाच जणांवर यात खटले चालवण्यात आले. या आरोपींवर लावण्यात आलेल्या आरोपांपैकी एकही आरोप तपास यंत्रणेला सिद्ध करता आला नाहीं असे न्यायालयाने आपल्या निकालपत्रात म्हटले आहे. 18 मे 2007 रोजी हा स्फोट झाला होता. त्याची तीव्र प्रतिक्रीया हैदराबाद परिसरात उमटली होती त्यावेळी हिंसाचार करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारातही पाच जण ठार झाले आहेत.

सुरूवातीला या प्रकरणाचा तपास सीबीआय अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला होता. त्यांनीच या प्रकरणात आरोप पत्र सादर केले. पण 2011 साली हे प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयए कडे सोपवण्यात आले होते. या प्रकरणातील संदीप डांगे आणि रामचंद्र कालसांगरा हे आरोपी अजूनही फरारीच असून सुनील जोशी नावाच्या आरोपीचा खटल्याच्या सुनावणी दरम्यान मृत्यू झाला आहे. स्वामी असिमानंद आणि भारत रतेश्‍वर हे दोन आरोपी सध्या जामीनावर मुक्त आहेत. तर या खटल्यातील अन्य तीन आरोपी मात्र कारागृहातच आहेत. एनआयएने या प्रकरणात एकूण 226 साक्षीदार आणि 411 कागदपत्रे न्यायालयात सादर केली. तथापी एनआयएने उभ्या केलेल्या साक्षीदारांपैकी अनेक साक्षीदार खटल्याच्या सुनावणीच्यावेळी फुटले आणि त्यांनी आरोपींना अनुकुल अशी साक्ष दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)