…हे सर्व थांबविण्याची धमक निवडणूक आयोगात आहे काय? – शिवसेना 

 “पैसा फेका आणि निवडणुका जिंका’ हे सर्व थांबविण्याची धमक निवडणूक आयोगात असेल तरच निवडणूक सुधारणांवर बोला

मुंबई: शिवसेनेने थेट निवडणूक आयोगालाच टार्गेट केले आहे. “पैसा फेका आणि निवडणुका जिंका असेच सगळे सुरू आहे. हे सर्व थांबविण्याची धमक निवडणूक आयोगात आहे काय? असेल तरच निवडणूक सुधारणांवर बोला. निवडणुकांतील पोकळ आश्वासने हा गुन्हा ठरणार असेल तर ‘‘निवडणूक गैरव्यवहार करणार्‍यांना चाप लावू’’ ही निवडणूक आयोगाची घोषणाही ‘पोकळ आश्वासन’ ठरू नये. नाहीतर गप्प बसावे व जे जे सुरू आहे ते ते उघड्या डोळ्यांनी पाहावे. सहनशीलतेचा अंत होईल तेव्हा जनताच बंड करील!” , अशे शिवसेनेने निवडणूक आयोगाला सामनाच्या अग्रलेखातून ठणकावले आहे.

-Ads-

निवडणुकीचा खेळखंडोबा निवडणूक आयोगाला मान्य असेल तर मग निवडणूक सुधारणांचे कागदी बाण सोडायचे कशासाठी? तुमचे ते शपथपत्र वगैरे ठीक आहे. पंतप्रधानपदापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत शपथेवर खोटे बोलणारे विराजमान होणार्‍या देशात निवडणूक सुधारणा व आचारसंहिता म्हणजे एक थोतांड म्हणायला हवे. ‘ज्याची लाठी त्याची म्हैस’, ‘ज्याच्या हाती ससा तोच पारधी’ यापासून निवडणूक आयोगही मुक्त नाही, असेही शिवसेनेने स्पष्ट केले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)