हे सरकार राजू शेट्टींचा ‘दाभोलकर’ करण्याच्या तयारीत : रविकांत तुपकर

कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 17 वि ऊस परिषद पार पडली दरवर्षी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद होत असल्याने त्यांना शह देण्यासाठी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी काही दिवसापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा कोडोली येथे शेतकरी ऊस परिषद आयोजित केली होती. मात्र या उस परिषदेचा स्वाभिमानीच्या ऊस परिषदेवर परिणाम जाणवला नाही नेहमीप्रमाणेच राजू शेट्टी यांच्या ऊस परिषदेला पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी तुफान गर्दी केली होती.

यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी ‘हे सरकार खासदार राजू शेट्टी यांचा ‘नरेंद्र दाभोलकर’ करण्याच्या तयारीत आहे, असा खळबळजनक आरोप केला. याबाबतीत माहिती देताना ते म्हणाले की ‘एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर आपल्याला ही माहिती दिली आहे.’ असे त्यांनी स्पष्ट केले. “शेट्टी सोडाच, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बिल्ला लावणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांच्या केसाला जरी हात लागला तरी घरात घुसून घुसून मारू,” असा सज्जड दम देखील त्यांनी भरला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सदाभाऊ खोत यांनी काढलेल्या रयत क्रांती संघटना आणि खासदार राजू शेट्टी यांच्या पासून फुटून गेलेल्या काही कार्यकर्त्यांनी काढलेली ही नवी संघटना यामुळे यंदाच्या ऊस परिषदेवर त्याचा काही परिणाम होतो का अशी चर्चा सुरू होती मात्र .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)