हे विश्वचि माझे घर

वृंदा कार्येकर

हे विश्वचि माझे घर हे भारतीयांनी खूपच अंगी बाणवलयं. बघा ना आमच्या ईथे डोंगरावर वनखातं दरवर्षी झाडे लावते, जगवते, आता वनखातं म्हणजे आपलचं की मग या टेकडीलगतच्या बायका जातात नि छान तोडून आणतात फांद्या.

आमच्या नसरापूरात तर बांबू का ,लाकडं काय, सरपणकाय?? चिंचा कैऱ्या काय? फुलं काय? आमच्या पन्हाळातलं सारं सर्वांचच कशाला विचारायचं मालकाला? लावायचं आम्ही, न्यायचं त्यांनी, हे विश्वचि माझे घर.

कुठेतरी दंगल होते .डोकी फुटतात,चपलाचं दुकान लुटलं जातं. लोक चपला आपल्याच समजून घरी नेतात .हे विश्वचि माझे घर.
घरातील केर छान काढला जातो. घर साफसूफ होतं,परसदारी टाकण्याच्या ऐवजी शेजाऱ्याच्या दारात केर टाकला जातो. शेजाऱ्याचं घर म्हणजे माझंच त्याचं परसू म्हणजेही माझचं. हे विश्वचि माझे घर.

सार्वजनिक नळाला नळ कशाला घरचाच तर तो नळ . वाहिलं जरा पाणी तर काय हरकत आहे?
घरात नाही का नळ गळतो कुठे दुरूस्त करा !, थांबेल आपोआप नाही तर घरातला दुसरा घेईलच बघून सारं मीच करायचं का ? हे विश्वचि माझे घर इतकं कशाला हो बोलता ?

रहातो दिवा पंखा चालू घरी नाही तरी असचं तर करतो. खोलीत नसताना पंखा लागतोच की घर गार नाही का रहातं ?दिवे नको का सर्व खोल्यात लक्ष्मी यायची वेळ झाली. मग राहिले देवळातले दिवे तर कशाला एवढं ओरडायचं ?देऊळ आमचंही नाही का ? आम्ही भक्त आहोत म्हणून देऊळ आहे .
हे विश्वचि माझे घर.

आणि आता रांगोळीविषयी…

मला रांगोळी आवडते, पण सध्या सारखी नाही . रांगोळी कळत नकळत काढावी ,आपल्या समाधानासाठी .लोकांनी कौतुक करावं म्हणून रांगोळी काढणं मला पसंत नाही . मोठ मोठ्या रस्त्यावर रांगोळ्या काढणं हे मला शक्ती वाया घालवल्या सारखं वाटतं .पर्यावरण हा विचार आहेच . पण रांगोळी हवी न पुसता येणारी. दीर्घकाळ टिकणारी पण दुसऱ्यानं चांगलं म्हणावं म्हणून काही करण्यापेक्षा मला त्यातून आनंद मिळावा .ही भावना असेल तर जास्त खरी सच्ची भावना.

तर रांगोळी जमिनीवर काढण्यापेक्षा मनावर हवी नात्यांची रांगोळी . सहज ऊमटावी . ठिपके जोडत जावं तशी माणसं जोडावीत . त्या ठिपक्‍यांना जोडणारी रेषामात्र भक्कम असावी . स्नेहाने तिची रूंदी वाढवावी . ती खोल जाईल मनामधे राहिल इतपत तिची देखभाल करावी . एकदा का त्रिमितीयुक्त रांगोळी पूर्ण झाली की मग रांगोळी पुसायची अंधुक ,अस्पष्ट व्हायची शक्‍यता कमीच.

तर ही कशी घालावी ? प्रत्येकाची पध्दत वेगळी. कधी नुसती सफेद कधी मुक्त हस्त चित्रा सारखी कधी रंगीत. रंग सुध्दा कसे हवेत आपुलकीचे , स्नेहाचे , मैत्रीचे मायेचे, जिव्हाळ्याचे , आस्थेचे प्रत्येकाच्या जोडलेल्या नात्या प्रमाणे. नंतर त्यात गहिरा रंग भरावा .मुक्त ,निष्कपटी भावनांचा रंग भरावा. निरागसता ओतावी नि प्रगल्भतेने तिचा विस्तार करावा.
अशी काढलेली रांगोळी सहजा सहजी पुसता तर येणारच नाही पण तिची खोली ,लांबी ,रूंदी ,गहराई मात्र दिसामाजी वाढत जाईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)