‘हे’ रेकॉर्ड विराटने मोडलं तर सचिन, विराटबरोबर सेलिब्रेशन करणार

मुंबई : एकदिवसीय क्रिकेटमधील सचिन तेंडुलरकरच्या नावे असलेला ४९ शतकांचा रेकॉर्ड विराटने मोडला तर सचिन विराटबरोबर शॅम्पेन पिऊन तो आनंद साजरा करणार आहे. मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना सचिन तेंडूलकरने सांगितले.

‘तुझा एकदिवसीय क्रिकेटमधील शतकांचा विक्रम विराट कोहलीने मोडला तर त्याला तू ५०  शॅम्पेनच्या बाटल्या भेट म्हणून देशील का?’असा प्रश्न सचिनला विचारण्यात आला होता. त्यावर सचिन म्हणाला, ‘मी विराटला अजिबात ५० शॅम्पेनच्या बाटल्या भेट देणार नाही. शॅम्पेनची एक बाटली मी स्वतः त्याच्याकडे घेऊन जाईन व त्याच्याबरोबर शॅम्पेन पिऊन हा आनंद साजरा करेल’.

-Ads-

दरम्यान, विराटच्या खात्यावर सध्या ३५ एकदिवसीय शतकं जमा आहेत. त्यामुळे येत्या काही वर्षांत सचिनचा विक्रम विराट मोडू शकतो.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)