‘हे’ राज्य ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या खेळाडुला देणार २ कोटी

पटना : बिहारच्या नितीश सरकारने राज्यातील खेळाडूंसाठी सर्वात मोठी घोषणा केली आहे. सरकारने प्रतिभावान खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी केल्यास २ कोटींचे बक्षीस जाहीर केले आहे. बिहार विधानपरिषदेमध्ये कला संस्कृती आणि युवा विभागाच्या बजेटवरुन वाद सुरु असताना ही घोषणा करण्यात आली आहे.

बिहारमध्ये अनेक खेळाडू आहेत. येथे खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्यासाठी प्रोत्साहनची गरज आहे. कला संस्कृती, खेळ आणि युवा विभागाचे प्रभारी मंत्री प्रमोद कुमार यांनी याची घोषणा केली आहे की, ऑलिंम्पिकमध्ये जो ही खेळाडू सुवर्ण पदक जिंकेल त्याला २ कोटीचे बक्षीस दिले जाईल. राज्यात १४१ स्टेडिअम बांधण्यात आले आहेत. काहीचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल. ५१ नव्या स्टेडिअमसाठी प्रस्ताव देण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)