‘हे’ दोन मोठे खेळाडू एकदिवसीय आणि टी २० मालिकेला मुकणार

वेस्ट इंडीज विरुद्ध भारत कसोटी मालिका चालू आहे. एकदिवसीय मालिकेसाठी आणि टी२० मालिकेसाठी वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळाने आपल्या संघाची घोषणा केली असून त्यामध्ये वेस्ट इंडीजचे दोन महत्वाच्या खेळाडूंचे नाव नाही.

धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल याने वैयक्तिक कारणांमुळे तो उपलब्ध होऊ शकत नसल्याचे कळवल्याने त्याचा संघात समावेश नाही तर फिरकीपटू सुनील नारायन याचा देखील संघात समावेश नाही. त्याला का निवडले गेले नाही याचा अजूनही खुलासा करण्यात आलेला नाही. यामुळे या संघाच्या यादीत तीन नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आहे.

-Ads-

२१ ऑक्टोबरपासून एकदिवसीय मालिका सुरु होत असून यात चंद्रपॉल हेमराज, फॅबियन ऍलन, आणि ओशन थॉमस या नवीन खेळाडूंना  पदार्पणाची संधी मिळू शकते. एकदिवसीय  मालीकेसाठी संघाच्या नेतृत्वाचा भर जेसन होल्डर यांच्याकडे खणाड्यावर आहे तर टी२० मालिकेसाठी कार्लोस ब्रेथवेट यांच्याकडे कर्णधारपदाची जबादारी आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)