हे करा ! नाहीतर होऊ शकते इंटरनेट बँकिंग बंद 

नवी दिल्ली – देशातील सर्वात मोठ्या बँकेने इंटरनेट बँकिंग संदर्भात मोठे पाऊल उचलले आहे. १ डिसेंबर नंतर इंटरनेट बँकिंग सेवा बंद होऊ शकते. या संदर्भातील सविस्तर माहिती एसबीआईने अधिकृत वेबसाइट onlinesbi.com वर दिली आहे.

एसबीआईने अधिकृत वेबसाइट वर दिलेल्या माहितीनुसार एसबीआई इंटरनेट बँकिंग सेवा वापरणाऱ्या ग्राहकांनी आपला मोबाईल नंबर बँकमध्ये रजिस्टर न केल्यास १ डिसेंबर नंतर इंटरनेट बँकिंग ब्लॉक होऊ शकते.आपल्या ग्राहकांना एसएमएस आणि इमेल अलर्टसाठी मोबाइल क्रमांक रजिस्टर करायला सांगा, असे निर्देश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ६ जुलै २०१७ रोजी एका निवदनाद्वारे बँकांना दिले होते. इंटरनेट बँकिंग ब्लॉक केल्यास ग्राहक इंटरनेट बँकिंगच्या  साहाय्याने पैशांची देवाण घेवाण करू शकणार नाही.

-Ads-

जाणून घ्या कसे करणार अपडेट :

ग्राहकांना आपला मोबाइल नंबर अपडेट करण्यासाठी बँकेच्या शाखेस जाऊन रजिस्टर करावा लागले, यासाठी ऑनलाईन सेवा उपलब्ध नाही. आपल्या बँक खात्यासोबत मोबाईल नंबर अपडेट करणे यासाठी सुद्धा महत्वाचे आहे कारण मोबाईल नंबर रजिस्टर केल्याने खात्या संबंधित देवाण – घेवाणाची संपूर्ण माहिती वेळोवेळी ग्राहकांना मिळू शकते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)