हे आपलेच कर्तव्य आहे….

१५ ऑगस्ट हा आपल्या राष्ट्राच्या इतिहासातील एक अभिमानाचा दिवस. भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून किती तरी स्वातंत्र्य-सैनिकांनी आपल्या प्राणाची आहूती दिली. परंतु अलीकडे हा दिवस उत्साहात, आनंदात साजरा करणे हळूहळू बंद होत आहे, याउलट एक सुट्टीचा दिवस म्हणून बरेचदा त्याकडे पहिले जात आहे. घरातील मोठ्या माणसांचे हळूहळू मुलेही हेच अनुकरण करताना दिसत आहेत. म्हणून सुट्टीच्या दिवशी मनसोक्त झोप आणि आराम असा एक दिनक्रम ब-याच घरांमध्ये दिसतो. मुख्यत: नोकरदार पालकांच्या घरी हे चित्र आवर्जून पाहायला मिळत आहे. आजकाल मुलांच्या, घरच्या जबाबदा-या पूरवता पुरवता पालकांची  दमछाक होत आहे हे देखील तेवढेच खरे आहे. पण म्हणून आपण एक पालक आणि भारतीय आहोत हे विसरणे बरोबर आहे का ?. पुढच्या पिढीला आपले स्वातंत्र्य-सेनानी, त्याचे पराक्रम, त्याग, त्याच्या स्मरणार्थ उभारलेले स्मारके यांची आपणच करून द्यावी हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. केवळ एक ऐतिहासिक आणि सुट्टी घालवण्याचे ठिकाण नसावे. 

मुले निश्चितच शाळेमध्ये भारतातील स्वातंत्र्य चळवळीचे आणि स्वातंत्र्य सेनानींच्या कर्तुत्वाचे धडे शिकत असतील. पण पालक म्हणून आपले कर्तव्य इथेच संपत नाही. आपल्या मुलांना स्वातंत्र्याविषयी माहित आणि त्यांना याची जाणीव करून देणे हे गरजेचे आहे.आपला राष्ट्रध्वज हा तीन रंगामध्ये आहे, तो कसा आणि कोणी तयार केला याची माहिती मुलांना काही कलाकुसर करता-करता आपण देऊ शकतो. त्यासाठी घरी रंगीत पेपरचा ध्वज बनवू शकता.
मुलांना आकर्षित करण्यासाठी ब्रेसलेट हि बनवू शकता, तसेच मुलींना डोक्याला लावण्यासाठी तीन रंगी रिबीन देखील बनवू शकता. तीन रंगी फुग्यांनी घराची सजावट करा ज्यामुळे १५ ऑगस्टला घरातदेखील स्वातंत्र्य दिनाचे वातावरण निर्माण होईल.

शाळांमधील स्वातंत्र्य दिनाचे सर्व कार्यकम झाल्यानंतर मुले सुट्टीचा दिवस म्हणून या दिवसाकडे पाहतात. परंतु, सुट्टीच्या दिवशी मुलांना संतुलित आहार मिळावा म्हणून   नेहमीच नव-नवीन प्रयोग आपण करतो. आज हि असेच काहीसे प्रयोग करा जेणे करून आजचा दिवस मुलांच्या कायम स्मरणात राहिल. तोंडी एखादी गोष्ट मुलांना समजावून देणे तसे सोपे काम नाही, अशा वेळेस Visual Graphics चा उपयोग करत, मुलांना देशभक्तीपर चित्रपट खूप मोलाचे आणि काम सोपे करून देतो. शहीद भगतसिंग, लगान, स्वदेश, पूरब और पश्चिम, शहीद इ. सारखे चित्रपट नक्कीच प्रभाव टाकून जातात. अथवा स्वातंत्र्य सेनानींची माहिती देणारे बाल-चित्रपट दाखवा, माहितीपट दाखवा त्यामुळे आपल्याच स्वातंत्र्याच्या इतिहासाची माहिती त्यांना करून देण्यात हे सर्व प्रयोग कमी येतील.

१५ ऑगस्टला आऊटिंग करण्यासाठी जर बाहेर जाण्याचा प्लान तयार असेल तर स्वातंत्र्याच्या लढाईचे पुरावे असलेल्या स्मारकांची सहल नक्की करावी आणि त्यामागील इतिहास मुलांना जरूर सांगावा. इंडिया गेट, जालियानवाला बाग किंवा लाल किल्ला सारख्या ऐतिहासिक महत्त्वाची ठिकाणी एक सहल जरूर करावी जर ते शक्य नसेल तर नेहमी इंटरनेटवर एक आभासी सहल,  स्वातंत्र्यपूर्व आणि नंतरचे जीवन आधारित माहिती देऊ शकतात.
गोष्टींची पुस्तके वाचणे हा मुलांचा अतिशय आवडीची गोष्ट असल्याने भारतीय इतिहास, स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलेले स्वातंत्र्य-सैनिक यांबद्दलची पुस्तके स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मुदाम मुलांना देऊन वाचावयास सांगावी अथवा आपण वाचून दाखवावी. हे सर्व प्रयोग आजच्या दिवशी केले तर आपली येणारी पिढी नक्कीच आपल्या स्वातंत्र्याविषयी जागरूक होईल. आणि हीच खरी आपल्या स्वातंत्र्य सेनानींना आदरांजली ठरेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)