हे आपणास माहीत आहे काय?

केरळमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे रबराचे उत्पादन १८ ते २० टक्क्यांनी कमी होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. देशातील रबराचे ८४ टक्के उत्पादन हे एकट्या केरळमध्ये होत असल्याने त्याचा रबर कंपन्यांवर परिणाम होणार आहे. कदाचित पुढील काळात टायरच्या किंमती त्यामुळे वाढू शकतात.

नजीकच्या भविष्यकाळात इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या मोटारी भारतीय रस्त्यांवर दिसू लागतील. त्या चालविण्यासाठी बॅटरी चार्ज करण्याच्या पायाभूत सुविधा असणे फार महत्वाचे असून काही महामार्गावर आणि काही शहरांत प्रत्येक ३ किलोमीटरवर चार्जिंग स्टेशन्स असतील, अशी तयारी सध्या सुरु आहे. असे केल्याने विजेवर चालणाऱ्या मोटारी लोकप्रिय होतील. या गाड्या स्वस्तात उपलब्ध व्हाव्यात, यासाठी त्यांच्यावरील कर कमी करणे तसेच परमित राजपासूनत्यांची सुटका करणे, अशा उपाययोजना सरकार करणार आहे.

ज्याची आर्थिक पत चांगली त्याला कमी व्याजदरात कर्ज तसेच त्याला कर्ज देण्यास प्राधान्य दिले जाते. पण ही पत कशी तपासायची, याचे मॉडेल करण्याचे पेटीएम कंपनीने हाती घेतले आहे. हे मॉडेल इतर बँकाही वापरण्याची शक्यता असून जे नियमित बँकिंग करतात त्यांना त्याचा अधिक लाभ होऊ शकतो.

कोणत्याही कार्डचा वापर न करता एटीएममधून पैसे काढता येतात का? या प्रश्नाचे उत्तर आता हो असे आहे. एअरटेल पेमेंट बँकेने ही सुरवात केली आहे. फोनचा वापर करून हे आता शक्य होणार असून सध्या या बँकेशी जोडलेल्या २० हजार एटीएमला ही सुविधा उपलब्ध झाली आहे. (आयएमटी एटीएम) ही संख्या वर्षअखेर एक लाखाच्या घरात जाणार आहे.

अनारक्षित रेल्वे तिकिटासाठी वापरला जाणारा कागद यापुढे एवढ्या मोठ्या प्रमाणावर वापरण्याची गरज पडणार नाही. अशी साधी तिकिटेही मोबाईलवर मिळण्याची सुरवात करण्यात आली आहे. २०१४ च्या दरम्यान हा प्रयोग नवा होता, पण आता या तंत्रज्ञानानेगेल्या वर्षी ६७ हजार तिकिटे काढली गेली. याचे प्रमाण पुढील काळात आणखी वाढेल.

भारतीय गुंतवणूकदारांची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक वाढतच चालली असून ती आता विक्रमी २५ लाख कोटींवर पोचली आहे. जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये तीत ८.४१ टक्के वाढ झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)