हेल्मेट सक्तीबाबत जरा सबुरीने घ्या!

गांधीगिरी करून जनजागृती करण्याचा सल्ला


सक्‍तीबाबतचा सल्ला सोशल मीडियावर “व्हायरल’

पुणे – हेल्मेट सक्ती आणि आकारल्या जाणाऱ्या दंडाविरोधात शहरामध्ये वातावरण चांगलेच तापले आहे. पण, या कारवाईबाबत “सबुरीने घ्या,’ अशा सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी हेल्मेट सक्ती आणि दंडाबाबत पोलीस आयुक्तांना दिल्या आहेत. पोलिसांनी गांधीगिरी करून जनजागृती करावी, असे बापट यांचे मत आहे.

हेल्मेट सक्ती आणि दंडाबाबत शहरातील अनेक सामाजिक संघटना सध्या एकवटल्या आहेत. “नो हेल्मेट’ दंडाच्या भीतीमुळे अनेकांनी जेथे दिसतील, तेथून हेल्मेट विकत घेतले आहेत. याशिवाय दुकानांमध्येही हेल्मेट घेण्यासाठी उड्या पडत आहेत. याशिवाय तोंडाला येईल त्या किंमतीत हेल्मेटची विक्री सुरू आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एका ठिकाणी हेल्मेट नसल्याचा दंड भरल्यानंतर पुढे दुसऱ्या चौकात आणखी कारवाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे वाहनचालकांची कोंडी होत असल्याचा आरोप होत आहे. याशिवाय अनेक संघटनांनी याला विरोध करून मोर्चेही काढले आहेत.
काही संघटनांनी मात्र हेल्मेटला विरोध नसल्याचे सांगितले, परंतु “आधी जागृती करा आणि नंतर दंड आकारा’ असेही सूचवले आहे. पालकमंत्र्यांनी हाच धागा पकडून सक्तीने दंड वसूल न करण्याबाबत सूचना केल्या आहेत. बापट यांचे हे विधान सोशल मीडियावर “व्हायरल’ झाले आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागात अनेक अरुंद रस्ते आहेत, छोटे गल्ली-बोळ आहेत. त्यामधून वाहन चालवताना वाहनांची वेगमर्यादा कमीच असते. अशावेळी हेल्मेट नसल्यास दंड आकारण्यापेक्षा प्रबोधन करणे हा मार्ग पोलिसांनी अवलंबावा, असाही सल्ला बापट यांनी दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान न करता बापट यांनी याबाबत सावध भूमिका घेत हेल्मेट सक्तीला विरोधही दर्शवला नाही आणि पाठिंबाही दर्शवला नाही. पण, या “व्हायरल’ सल्ल्याची चर्चा शहरात दिवसभर होती. आता या प्रकरणात पोलीस आयुक्‍त काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)