हेल्मेट सक्तीच्या काळात ‘पब्जी गेम’मधील हेल्मेट सर्वात ट्रेंडी

पुणे शहरात 1 जानेवारीपासून हेल्मेटसक्ती करण्यात आली असून, कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी ही जोरदार पद्धतीने होत असल्याचे चित्र सध्या शहरात दिसून येत आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त यांनी पुणेकरांना नवीन वर्षांच्या सुरुवातीलाच हेल्मेटसक्तीची नवीन भेट दिली आहे. मात्र पुणेकरणांनी हेल्मेटसक्ती हि भेट स्वीकारली नसून, या सक्ती विरोधात जोरदार मोर्चे आणि घोषणाबाजी केली आहे. तर दुसरीकडे व्यापाऱ्यांनी हेल्मेटसक्तीचा चांगलाच फायदा घेतला आहे. बाजारात हेल्मेट विक्री सध्या मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मोठं-मोठी दुकाने असो किंवा रस्त्याच्या कडेला, अश्‍या सर्वच ठिकाणी हेल्मेट विक्री सध्या जोरदार चालू आहे. त्यामध्ये अनेक नवीन कंपन्यांचे आणि ग्राफिक्‍स असणारे, ट्रेंडी हेल्मेट दिसून येत आहे. मात्र सध्या तरुणांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या ‘पब्जी गेम’ मधील हेल्मेट हे सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

हेल्मेटमध्ये सध्या अनेक नवीन प्रकार मोठ्या प्रमाणात आले असून, जे नागरिक हेल्मेटसक्ती विरोधात होते ते पण हेल्मेटला पसंती देत असल्याचे दिसून येते. स्टील बर्ड, वेगा, स्टड अशा कंपन्यांचे हेल्मेट मोठ्या प्रमाणात दिसून येतात. त्यामध्ये नवीन ग्राफिक्‍स, लुक, मल्टि कलर आणि स्टिकर अश्‍या सर्वच गोष्टींचा उपयोग करून हेल्मेटला एक नवीन आणि ट्रेंडी लुक देण्यात आला आहे. त्यामध्ये स्टील बर्ड जोरो, स्टड निंन्जा अशा स्पोर्टी लूक हेल्मेट सुध्दा पाहण्यास मिळतात. पुण्यातील ‘नाना पेठ’ सारख्या ठिकाणी अशा प्रकारातील हेल्मेट मोठ्या प्रमाणात दिसून येतात. पाचशे रुपयांपासून तर, पाच ते सहा हजार रुपयांपर्यंत अशा हेल्मेटची किंमत आहे. नाशिक-फाटा, भोसरी, खडकी, पिंपरी- चिंचवड, सिंबॉयसिस कॉलेज आणि पुणे युनिव्हरस्टी रोड अश्‍या सर्वच ठिकाणी, रस्त्यावरसुध्दा तीनशे ते हजार रुपयांपर्यंत हेल्मेट मिळता आहेत.तसेच ऑनलाईन सुध्दा स्वतः आणि चांगल्या कंपन्यांचे हेल्मेट घरबसल्या मिळू शकतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

– ऋषिकेश जंगम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)