हेल्मेट वापरा ‘सुरक्षेसाठी’: संदेशाचे फलक घेऊन जनजागृती

पुणे – हेल्मेट वापरा सुरक्षेसाठी, आपण सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित अशाप्रकारे हेल्मेट वापराचे संदेश देत विद्यार्थी आणि वाहूतक पोलिसांनी नागरिकांमध्ये जनजागृती केली. चित्रांच्या स्वरुपात तयार केलेली संदेश फलके हाती घेऊन स्वारगेट येथील स्वा. केशवराव जेधे चौकात हा उपक्रम राबवण्यात आला. यात विद्यार्थ्यांसह वाहतूक पोलिसांनीही सहभाग घेतला.

वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त नागनाथ वाकुडे, स्वारगेट वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रभाकर ढगे, कला प्रसारणी सभा न्यासाचे सचिव पुष्कराज पाठक आदींच्या उपस्थितीत बुधवारी सकाळी हा उपक्रम राबवण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहरात नववर्षापासून हेल्मेटसक्तीच्या कारवाईचा वेग वाढवण्यात आला आहे. यानंतर नेहमीप्रमाणे काही लोकांकडून याला विरोध सुरु झाला आहे. मात्र, स्वः सुरक्षेसाठी हेल्मेट आवश्‍यक असून त्याला विरोध करु नका. हेल्मेट ही सक्ती नसून सुरक्षितता आहे. हेल्मेट नसल्याने होणारे अपघात धोकादायक असून हे टाळण्यासाठी हेल्मेटचा वापर करा, याविषयी महत्व पटवून देण्यासाठी विद्यार्थ्यांनी हातात फलके घेऊन लोकांना आवाहन केले. तसेच, अशा प्रकारचे पोस्टर्स स्वारगेट चौकात लावण्यात आले असून इतर चौकातही ते लावण्यात येणार आहेत.

…हेल्मेट स्मार्टनेसचे सिम्बॉल व्हावे
सुरक्षेसाठी सर्वांनी हेल्मेट वापरण्याची गरज आहे. पुणेकरांनी हेल्मेटचे महत्व समजावून घेत स्वतःहून ते वापरण्यासाठी पुढाकार घ्यावा. हेल्मेट हे तरुणाईंच्या स्मार्टनेसचे सिम्बॉल व्हावे.
– प्रभाकर ढगे, पोलीस निरीक्षक, स्वारगेट वाहतूक विभाग


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)