हेल्मेट जनजागृतीसाठी मोटारसायकल रॅली

पुणे – सुरक्षेसाठी हेल्मेटचा वापर महत्त्वाचा असून याविषयी नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील वेगवेगळ्या सहा मार्गांवरून काढण्यात आलेल्या या रॅलीचा समारोप पोलीस मुख्यालयातील मैदानावर झाला. सामान्य नागरीक, वाहतूक पोलिसांसह तब्बल एक हजार दुचाकीस्वारांनी या रॅलीत सहभाग नोंदविला होता.

झेनेक्‍स इनोव्हेशन व पुणे ट्रॅफिक पोलीस यांच्या वतीने या रॅलीचे आयोजन केले होते. यानुसार मगरपट्टा हडपसर, गोळीबार मैदान, एमजी रोड, सणस ग्राऊंड स्वारगेट, डीपी रोड कोथरूड, बालेवाडी या वेगवेगळ्या 6 ठिकाणांवरून सकाळी पावणेआठ वाजता रॅलीला सुरवात झाली. तर सुमारे दहा वाजता पोलीस मुख्यालय, शिवाजीनगर येथे समारोप करण्यात आला. यावेळी पोलीस आयुक्त के. वेंकटेशम, पोलीस उपायुक्त (वाहतूक) तेजस्वी सातपुते, संचेती हॉस्पिटलचे चेअरमन पराग संचेती, झेनेक्‍स इनोव्हेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुज गुप्ता आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सातपुते म्हणाल्या, जीवाला धोकादायक ठरू शकतात, असे दहा विविध प्रकारचे वाहतूक नियमभंग आहेत. त्यामध्ये मद्यपान करून वाहन चालविणे, ट्रीपल सीट, हेल्मेट व सीटबेल्ट विना वाहन चालवणे, सिग्नल तोडणे अशा उल्लंघनांचा समावेश आहे. आजच्या रॅलीमधून याबाबत जनजागृती करण्यात आली. हेल्मेटबाबतचा कायदा हा आधीपासून होता. तसेच, त्याची अंमलबजावणी देखील होत होती. मात्र, यावर्षी अधिक जागरूकता निर्माण करून ही अंमलबजावणी तीव्र करण्यात आली आहे. यावेळी गुप्ता यांनीही आपले मत व्यक्त केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)