हेल्मेटसक्तीची कारवाई 1 जानेवारीपासूनच

सरकारी कार्यालयातील एचओडींना पाठवली पत्र

पुणे – हेल्मेटसक्तीची कारवाई 1 जानेवारीपासूनच होणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांवर व सर्वसामान्यांवर वेगवेगळी कारवाई असे केले जाणार नाही. मात्र जनजागृतीचा एक भाग म्हणून सरकारी कार्यालयातील एचओडींना पत्र पाठवण्यास सुरवात झाली आहे. त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्तीचे पालन करण्यास लावावे अशी सूचना करण्यात आली असल्याची माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी दिली.

-Ads-

सातपुते म्हणाल्या, सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करणे अशक्‍य आहे. पुण्यातील लाखो दुचाकीस्वारांपैकी काही टक्केच दुचाकीस्वार हेल्मेट वापरतात. यामुळे त्यातून सरकारी कर्मचारी ओळखणे अशक्‍य आहे. यामुळे सर्वच दुचाकीस्वारांवर हेल्मेट सक्तीची कारवाई 1 जानेवारी पासूनच करण्यात येणार आहे. सध्यातरी जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. यामध्ये सरकारी कार्यालयातील एचओडींना पत्र पाठवणे सुरु केले आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांनी हेल्मेट सक्तीचा सरकारी आदेश पाळावा. आपणच कायदे तयार करत असल्याने त्याचे पालन करणे आपले कर्तव्य आहे असे स्पष्ट सह आयुक्त शिवाजी बोडखे यांनी व्यक्त केले होते. त्यापार्श्‍वभूमीवर मंगळवारपासून दुचाकीस्वार सरकारी कर्मचारी असेल तर त्यावर हेल्मेट सक्तीची कारवाई करण्यात येणार असल्याची चर्चा होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
1 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)