हेल्मेटचा वापर गरजेचा, पण जनजागृती व्हावी : पालकमंत्री

पुणे – वाढत्या अपघातांची संख्या लक्षात घेता हेल्मेटचा वापर गरजेचा आहे. यानुसार महामार्गावर हेल्मेट वापरणे बंधनकारक असायलाच हवे. मात्र, शहरातील रस्ते अरुंद असून वाहनांचा वेग कमी असतो. अशा ठिकाणी कायद्याचे पालन गरजेचे असून पोलिसांनी व्यवहारिक मार्ग काढावा, असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.

वाहतूक पोलिसांकडून शहरात हेल्मेटसक्तीबाबत कठोर कारवाई सुरू आहे. साधारण रोज सहा ते सात हजार जणांवर कारवाई केली जात आहे. याविरोधात काही व्यक्ती पुढे आल्या असून त्यांनी विरोध सुरू केला आहे. या पार्श्‍वभूमीवर बापट यांनी सूचक वक्‍तव्य केले आहे. बापट म्हणाले, “अपघातात हेल्मेट नसल्याने डोक्‍याला मार लागून मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. यामुळे हेल्मेट वापरणे गरजेचे बनले असून महामार्गावर याची जास्त गरज आहे. याबाबत न्यायालयाने आदेश दिले आहेत. यामुळे आदेशाचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र, शहरातील रस्ते अरुंद असल्याने वाहनांचा वेग कमी असतो. अशावेळी पोलिसांनी व्यावहारिक मार्ग काढून प्रबोधनावर भर द्यावी,’ जास्तीत जास्त नागरिकांचे प्रबोधन करण्याची गरज असल्याचे बापट यांनी यावेळी सांगितले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)