हेल्पिंग हॅन्डकडून तीन विद्यार्थी शिक्षणासाठी दत्तक

शिळवंडीतील विद्यार्थ्यांना पावसाळी ड्रेसचे वाटप
कोतूळ – अकोले तालुक्‍यातील शिळवंडी येथे संत ज्ञानेश्‍वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मुंबईतील हेल्पिंग हॅंन्ड ग्रुपने पावसाळी ड्रेसचे वाटप केले. रुक्‍मिणी साबळे, प्रवीण साबळे , निकिता साबळे या विद्यार्थ्यांना हेल्पिंग ग्रुपने दत्तक घेतले. त्यांचा शिक्षणाचा सर्व खर्च यापुढे ग्रुप करणार आहे.
ग्रुपने शिळवंडी शाळेला प्रोजेक्‍टरही भेट दिला. दहावीच्या परीक्षेत प्रथम आलेली प्रियंका घुटे, द्वितीय आलेली रुक्‍मिणी साबळे , तृतीय क्रमांक मिळवलेली प्रियंका घोडे यांना मनगटी घड्याळ भेट देण्यात आले. ग्रुपचे सदस्य दीपाली जाधव, आसावरी यादव, श्रुतिका गवस, स्नेहल गिते , घोटीच्या सरपंच संगीता घोडे, शिळवंडीचे सरपंच सहादू साबळे, मुख्याध्यापक रामदास गिते, स्कूल कमिटीचे अध्यक्ष ठकाजी साबळे , शिक्षक बाळासाहेब चौधरी, अण्णासाहेब वलवे, प्रकाश सुर्वे, गणेश साळवे , सुदाम बटवाल यावेळी उपस्थित होते . रॅंपटीन रिसर्च लिमिटेड कंपनीत सेवेत असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा हेल्पिंग हॅन्ड हा ग्रुप आहे. सामाजिक भावनेतून गरीब, वंचितांना मदतीचा हात देता यावा म्हणून सदस्य आपल्या पगारातून दरमहा बचत करतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)