हेल्पर्स ऑफ हॅन्डिकॅप्डच्या प्रकल्पास सहाय्य करू

कोल्हापूर – हेल्पर्स ऑफ हॅन्डिकॅप्ड संस्थेच्यावतीने कुडाळ येथे स्वप्ननगरी या प्रकल्पाची उभारणी होत आहे. यामध्ये काजू प्रक्रिया केंद्र व वसतीगृह यांचा समावेश आहे. सुमारे 4 कोटींच्या या प्रकल्पाचे दीड कोटी रुपयापर्यंतचे काम झाले असून प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अद्यापही अडीच कोटी रुपयांची रक्कम आवश्‍यक आहे. यातून सुमारे 150 दिव्यांगांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी सर्वोतपरी मदत करण्याची ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

उचगाव येथील दि हेल्पर्स ऑफ हॅन्डिकॅप्ड संस्थेच्या कार्यालयास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी संस्थेच्या नसीमा हुरजूक, पी.डी.देशपांडे, मनोहर देशभ्रतार, अय्याज संग्रार, कौसर संग्रार यांची उपमुख उपस्थिती होती.

स्वप्ननगरी नियोजित प्रकल्पाचे समग्र छायाचित्र नसीमा हुरजूक यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना दाखवून हे आमचे स्वप्न असल्याचे सांगितले यावर आपले स्वप्न निश्‍चितपणे पूर्ण केले जाईल, असा अश्वासक दिलासा पालकमंत्री पाटील यांनी दिला. कुडाळ येथे उभारण्यात येत असलेला हा प्रकल्प 10 एकर जागेवर उभारण्यात येत असून यामध्ये काजू प्रक्रिया युनिट व वसतीगृहाचा समावेश आहे. पूर्णक्षमतेने हे युनिट सुरु झाल्यास या ठिकाणी 150 दिव्यांगांना रोजगार उपलब्ध होणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)