नवी दिल्ली: दिल्ली उच्च न्यायालयाने आज कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची नॅशनल हेरॉल्ड विषयीची याचिका फेटाळून लावली. सोनिया आणि राहुल गांधी यांच्या 2011-12 या वर्षाच्या करविवरणाच्या तपासणीस या याचिकेद्वारे विरोध करण्यात आला होता. मात्र उच्च न्यायालयाचे न्या. एस. रविद्र भट आणि न्या. ए.के. चावला यांनी ही याचिका फेटाळून लावली. कॉंग्रेस नेते ऑस्कर फर्नांडिस यांनीही 2011-12 सालचे करविवरणाचे तपशील नव्याने तपासण्यास विरोध दर्शवला होता. मात्र उच्च न्यायालयाने फर्नांडिस यांचीही याचिका फेटाळून लावली.

कर विवरणाचे तपशील तपासण्याचा कर विभागाला अधिकार आहे. त्यामुळे गांधी आणि फर्नांडिस यांनी कर विभागाकडेच आपले म्हणणे मांडावे, असे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले. 2011-12 या वर्षाच्या कर विवरणामध्ये राहुल गांधी हे “यंग इंडिया’ कंपनीचे संचालक नसल्याचा दावा न्यायालयात करण्यात आला होता. “यंग इंडिया’तून राहुल गांधी यांना काही उत्पन्न मिळत नसल्याने हा तपशील विवरणात केला गेला नव्हता, असे राहुल गांधी यांच्यावतीने सांगण्यात आले होते. ही बाब तपासण्यासाठी हे प्राप्तीकर विवरण पुन्हा तपासण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)