“हेरा फेरी 3′ पुढच्या वर्षी रिलीज होणे अवघड 

अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनिल शेट्टीच्या “हेरा फेरी’च्या सिरीजने लागोपाठ दोन सिनेमातून धुमाकूळ घातला होता. पहिल्या दोन्ही सिनेमांमधून या तिकडीने जी काही धम्माल कॉमेडी केली, त्याला तोड नाही. पहिल्या दोन सिनेमांना मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे या सिरीजमधील तिसरा भाग कधी येतो, याची प्रेक्षकांकडून आतुरतेने वाट बघितली जात होती. या सिरीजमधील तिसरा सिनेमा 2019 साली येईल, असे बोलले जात होते.
मात्र आता ती शक्‍यता कमी वाटायला लागली आहे. आता लेटेस्ट घडामोडींमुळे “हेरा फेरी 3′ 2020 पर्यंत नक्की येऊ शकणार नाही. फिरोज नाडियादवालाने हा तिसरा “हेरा फेरी’ करण्याची तयारी केली होती. प्राथमिक माहितीनुसार यामध्येही अक्षय कुमार, सुनिल शेट्टी आणि परेश रावल असणार आहेत. याची “वन लाईनर थीम’ अक्षय कुमारला ऐकवली गेली होती. ती थीम अक्षयला आवडली.
मात्र त्याने जेंव्हा सविस्तर कथा ऐकली, तेंव्हा त्याला त्यात काहीही दम नसल्याचे जाणवले. आता लेखकांची टीम जानेवारी महिन्यापासून नव्याने कथा लिहायला बसणार आहे. म्हणजे 2019 च्या मध्यापर्यंत शुटिंगची सुरुवात होईल. प्रेक्षकांना “हेरा फेरी’च्या सिरीजकडून खूप अपेक्षा आहेत, त्यामुळे स्क्रीप्टबाबत कोणतीच तडजोड करायला अक्षय कुय्मार तयार नाही.
What is your reaction?
5 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)