हेरगिरी बद्दल माजी नौदल अधिकाऱ्याला सात वर्ष सक्त मजुरी

नवी दिल्ली – सन 2006 च्या नौदल वॉर रूम हेरगिरी प्रकरणात दिल्लीच्या न्यायालयाने एका निवृत्त नौदल अधिकाऱ्याला सात वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे. या अधिकाऱ्याचा हा गुन्हा थेट राष्ट्रीय सुरक्षाच धोक्‍यात आणणारा आहे असे मतही न्यायालयाने नोंदवले आहे.

सलामसिंह राठोड असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायाधिश एस. के आगरवाल यांनी आज हा निकाल दिला. या प्रकरणातील दुसरे आरोपी नौदल कमांडर जर्नेलसिंग कालरा यांना मात्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. नौदलाच्या वॉर रूम शी संबंधीत कागदपत्रे बाहेर पुरवल्याचा त्यांच्यावर आरोप होता. राठोड यांना जेव्हा अटक केली त्यावेळीही त्यांच्याकडे वॉर रूममधील अनेक कागदपत्रे आढळून आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)