हेमा कोटणीस यांना २०१८’चा दादा साहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म पुरस्कार

करण कोटणीस यांना दादा साहेब फाळके बेस्ट आंत्रप्रेन्योर पुरस्कार

पुणे: पुण्यातील कल्याणीनगरच्या हेमा कोटनीस यांना नुकतेच प्रतिष्ठीत अश्या दादा साहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म पुरस्कार २०१८ ने सन्मानित करण्यात आले. नवी दिल्ली येथे झालेल्या बेस्ट मिसेस इंडिया (एप्रीसीएशन अॉफ द क्रिएशन) मध्ये त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. आज १ नोहेंबर रोजी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार वार्तेत त्यांनी ही माहिती दिली. तसेच कोटणीस ग्रुपचे सीईओ करण कोटणीस यांना पर्यटन आणि आतिथ्य उद्योगसाठी बेस्ट अंत्रोप्रिन्युअर हा पुरस्कार मिळाला आहे.

या प्रसंगी बोलताना हेमा कोटनीस म्हणाल्या, “हा प्रतिष्ठीत पुरस्कार आणि गौरव मिळणे ही माझ्यासाठी मोठी गर्वाची आणी सौभाग्याची बाब आहे. मला आनंद आहे की या यशाने माझ्या कुटुंबाचा आणि शहराला अभिमान वाढविला आहे. माझ्या कुटुंबाचा आणि शुभचिंतकांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य झाले नसते. ”

याआधी हेमा कोटनीस यांना एलिट मिसेस इंडिया 2016 ने देखील सन्मानित करण्यात आहे आहे. हेमा कोटनीस सौंदर्य जगतातील एक प्रसीद्ध नाव आहे.

कोटणीस ग्रुपचे सीईओ करण कोटणीस यांना पर्यटन आणि आतिथ्य उद्योगसाठी दादासाहेब फाळके बेस्ट अंत्रोप्रिन्युअर हा पुरस्कार मिळाला आहे.

करण कोटणीस म्हणाले, हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाल्याने मला खूप आनंद झाला आहे. मी माझ्या कुटुंबाचा व वडिलांचा आभारी आहे त्यांचा पाठिंबा माझ्यासाठी बहुमूल्य होता. यातुनच मला पुढे जाण्याचा आत्मविश्वास मिळाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup: Thumbs up
5 :heart: Love
2 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
3 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)