हेमंत पाटील महिला प्रीमियर लीग : शिवनेरी पॅंथर्स, एचपी सुपर किंग्स उपान्त्य फेरीत 

पुणे – शिवनेरी पॅंथर्स व एच. पी. सुपर किंग्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करताना हेमंत पाटील महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत प्रवेश केला. हेमंत पाटील स्पोर्टस फाउंडेशन व भारत अगेन्स्ट करप्शन यांच्या सहयोगाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. व्हिजन क्रिकेट अकादमी, सिंहगड रोड येथील क्रिकेट मैदानावर सुरूअसलेल्या या स्पर्धेतील आजच्या पहिल्या साखळी सामन्यात आरती भेनवलच्या (2-5) सुरेख गोलंदाजीसह पूनम खेमनारच्या उपयुक्‍त 36 धावांच्या खेळीच्या जोरावर एचपी सुपर किंग्स संघाने तोरणा टायगर्स संघाचा 4 गडी राखून पराभव करून उपान्त्य फेरी गाठली.

प्रथम फलंदाजी करताना तोरणा टायगर्स संघाचा डाव 19.5 षटकांत 102 धावांवर संपुष्टात आला. यात श्वेता जाधवने एका बाजूने लढताना सर्वाधिक 56 धावा केल्या. प्रिया भोकरे (3-18), आरती भेनवल (2-5), तेजश्री ननावरे (1-20), स्वांजली मुळे (1-16), प्रिया सिंग (1-14) यांनी अफलातून गोलंदाजी करताना एचपी सुपर किंग्स संघाच्या विजयाचा पाया रचला. एचपी सुपर किंग्सने हे आव्हान 16.1 षटकांत 6 बाद 106 धावा करून पूर्ण केले.यात पूनम खेमनारने 36 धावा, तेजश्री ननावरेने 22 धावा व ऋतुजा गिलबिलेने नाबाद 14 धावा करून संघाला विजय मिळवून दिला. प्रभावी गोलंदाजी करून विजयात मोलाचा वाटा उचलणारी आरती भेनवल सामन्याची मानकरी ठरली.
दुसऱ्या सामन्यात सायली लोणकर (नाबाद 65) व माधुरी आघाव यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर शिवनेरी पॅंथर्स संघाने रायगड रॉकर्स संघाचा 49 धावांनी पराभव करून सलग तिसऱ्या विजयासह दिमाखात उपान्त्य फेरीत धडक मारली. पहिल्यांदा फलंदाजी करताना शिवनेरी पॅंथर्स संघाने निर्धारित 20 षटकांत 1 बाद 169 धावांची मजल मारली. त्यानंतर रायगड रॉकर्स संघाचा डाव 18.3 षटकांत सर्वबाद 120 धावांवर गुंडाळून शिवनेरीने चमकदार विजयाची नोंद केली. ईश्वरी सावकारने 8 धावांत 4, किरण नवगिरेने 10 धावांत 2, भूमिका उंबरजेने 21 धावांत 2, तर प्रियांका कुंभारने 34 धावांत 1 बळी घेत विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.

सविस्तर निकाल- साखळी फेरी – तोरणा टायगर्स – 19.5 षटकांत सर्वबाद 102 धावा (श्वेता जाधव 56(45), चार्मी गवई 13 (7), प्रिया भोकरे 3-18, आरती भेनवल 2-5, तेजश्री ननावरे 1-20, स्वांजली मुळे 1-16, प्रिया सिंग 1-14) पराभूत वि. एचपी सुपर किंग्स – 16.1 षटकांत 6 बाद 106 धावा (पूनम खेमनार 36, तेजश्री ननावरे 22 (15), ऋतुजा गिलबिले नाबाद 14 (11), चार्मी गवई 2-10, ख़ुशी मुल्ला 1-8, नेहा बडवाईक 1-15); सामनावीर-आरती भेनवल;
शिवनेरी पॅंथर्स – 20 षटकांत 1 बाद 169 धावा (सायली लोणकर नाबाद 65 (55), माधुरी आघाव नाबाद 51 (32), गौतमी नाईक 30 (34), सोनाली शिंदे 1-17) वि.वि. रायगड रॉकर्स – 18.3 षटकांत सर्वबाद 120 धावा (सोनाली शिंदे 24 (25), उत्कर्षा पवार 19 (11), शिवानी भुकटे 19 (13), कश्‍मिरा शिंदे 10 (12), ईश्वरी सावकार 4-8, किरण नवगिरे 2-10, भूमिका उंबरजे 2-21, प्रियांका कुंभार 1-34); सामनावीर-सायली लोणकर.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)