हॅलो फॉरेस्ट यंत्रणेमुळे वनविभाग सतर्क

इंदापूर – राज्य शासनाच्या हॅलो फॉरेस्ट संपर्क यंत्रणेमुळे राखी बगळ्यावर त्वरित उपचार होवून त्याचे प्राण वाचविण्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले.
भीमानगर येथील उजनी जलविद्युत केंद्राजवळ दोन्ही पायाला गंभीर दुखापत झालेल्या अवस्थेतील राखी बगळा रात्री एक वाजण्याच्या सुमारास प्रशांत नावाच्या युवकास आढळून आला. त्याने इंदापूर महाविद्यालयाचे प्रा.डॉ.राजेंद्र साळुंखे यांना याची माहिती दिली, त्याचबरोबर राज्य शासनाच्या हॅलो फॉरेस्ट यंत्रणेशी संपर्क साधून सर्व तपशील सांगितला, त्याच्या अनुषंगाने उपवनसंरक्षक लक्ष्मी ए. यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. पुण्याहून इंदापूर वनपरिक्षेत्र अधिकारी राहूल काळे यांना तसे कळवण्यात आले. काळे यांनी इंदापूरचे वनपाल पी.डी.चौधरी, वनसंरक्षक एस.व्ही.बागल, एन.सी.चव्हाण, एन.एन.गुंड,बी.बी.वाघमोडे यांनी घटनास्थळी आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.काकडे यांनी राखी बगळ्यावर प्रथमोपचार केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी बगळ्याला कात्रज, पुणे येथील राजीव गांधी प्राणी अनाथालयात पाठवण्यात आले. पहाटे तीन वाजता राखीबगळा पुण्यात पोहोचला आणि पुढील उपचारांमुळे त्याला जीवदान मिळू शकले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)