हॅरिस ब्रिज मार्चअखेर खुला

  • रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात : वाहनचालकांची मिळणार दिलासा

पिंपरी – निगडी ते दापोडी दरम्यान असलेल्या हॅरिस पुलाला समांतर बांधण्यात आलेल्या दुसऱ्या पुलावर दोन दिवसापूर्वी अंतिम स्लॅप टाकण्यात आला. तसेच, नवीन पुलावरील दोन्ही बाजूच्या रस्त्याचे कामही सुरु करण्यात आले असून मार्च महिन्याच्या अखेरीस पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. यामुळे, वाहनचालकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला जोडणारा हॅरिस पुल आहे. या पुलावरुन पुण्याच्या दिशेने जाणारा मार्ग मागील काही महिन्यात सुरु केल्याने एका बाजूची कोंडी कमी झाली. परंतु, पुण्यावरुन पिंपरीला येणाऱ्या पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. ही कोंडी टाळण्यासाठी दुसऱ्या बाजूचे कामही पूर्णत्वास येत आहे. तसेच, सीएमईसमोरील सबवेचे काम काम अंतिम टप्यात असल्यामुळे वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे. या पुलावरुन पाचदाऱ्यांना चालण्यासाठी प्रशस्त पदपथ बांधण्यात येणार आहे. दुसऱ्या बाजूला असणाऱ्या पुलाच्या मार्गावरील झोपडपट्टयाचे स्थलांतर केल्यानंतर पोच रस्त्याचे आणि पुलाचे काम महापालिकेने हाती घेतले. पूलाचे बांधकाम सुरु असताना मोठ्या प्रमाणात वाहतूकीच्या समस्या निर्माण झालेल्या होत्या, परंतु, अशा परिस्थितीतही प्रशासनाने पुलाचे वेगाने काम सुरु केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे व पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरातील नागरिकांची ये-जा मोठ्या प्रमाणात असल्याने या पुलावर सतत वाहतूक कोंडी होते. या कोंडीतून मुक्तता होण्यासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेने संयुक्तरित्या हा प्रकल्प मे 2016 मध्ये हाती घेतला. या प्रकल्पाचा खर्च 22 कोटी 46 लाख रुपये आहे. पुलाची लांबी 202 मीटर असून रुंदी 10.5 मीटर आहे. तसेच, पुण्याकडील पोच रस्त्याची 145 मीटर असून पिंपरीच्या दिशेची 65 मीटर आहे. याचबरोबर, पुण्याकडून पिंपरीच्या दिशेने येण्यासाठी वाहनांना चार लेन उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.

समांतर पुलावरील पथदिवे, संरक्षण कठडे, रस्ते, रंगरंगोटी व इतर कामे पंधरा मार्चपर्यत केली जाणार आहेत. तसेच, पंचवीस मार्चपर्यत पुलावर वाहनांची ट्रायल घेतली जाणार असून 31 मार्चपर्यत पूल वाहतूकीसाठी खुला करण्यात येणार आहे. या पुलामुळे दोन्ही शहरात ये-जा करणाऱ्या नागरिकांना सोईचे होणार आहे. तसेच, वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
– विजय भोजणे, उपअभियंता तथा प्रवक्ता, पिंपरी-चिंचवड महापालिका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)