हॅरिसन फॉलीत बेकायदा बांधकाम

प्रांताधिकाऱ्यांनी ठोठावला दंड
पाचगणी/प्रथिनिधी
दांडेघर येथील सर्व्हे हॅरिसन फॉली (सर्व्हे न. 10) या जमिनीवर सुरु असलेला व्यवसाय तात्काळ बंद करावा तसेच तेथील बांधकाम तातडीने हटवावे असा आदेश देवून या जमिनीचा अकृषक कारणासाठी वापर केल्या बद्दल दंडाची रक्कम भरावी असा आदेश वाईच्या प्रांताधिकाऱ्यांनी बजावला आहे.सुहास लक्ष्मण वाकडे यांच्या तर्फे पुनम अशोक कांबळे या मुखत्यारांना हा आदेश बजावण्यात आला आहे.या ठिकाणी शासनाची परवानगीन घेता गाकार्टींग ,बॉटलींग बॉल चा व्यवसाय तसेच अनाधिकृत शेड उभारल्या प्रकारणी हा आदेश देण्यात आला आहे.
केदारेश्वर देवस्थान ट्रस्टची दांडेघर येथील हॅरिसन फॉली (सर्व्हे क्र. 10) या जमिनीबाबत ग्रामस्थ आणि सुहास वाकडे यांच्यात अनेक वर्षांपासून वाद सुरु आहे.वाकडे यांनी या जमिनीचे मुखत्यारपत्र पूनम कांबळे यांना दिले आहे. पांचगणी – महाबळेश्वर हे इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये असल्याने शेत जमीन व बांधकामांवर बरेचसे निर्बंध घातले असतानाही या मिळकतीत कांबळे यांनी प्रवेशद्वारावर लोखंडी पत्र्याचे अनधिकृत खोके ठेवून त्या ठिकाणी प्रवेश फी आकारणी सुरु केली. तसेच या जागेत कंटेनर ठेवले आहेत. विनापरवाना व अनधिकृतपने गोकार्टींग व्यवसाय सुरु केला आहे. बॉटलींग बॉलहि ठेवला आहे. यावरून वाईचे प्रांताधिकाऱ्यांनी कांबळे यांना दिलेल्या आदेशात दांडेघर येथील सर्वे क्र.10 येथील प्रवेशद्वाराजवळील लोखंडी पत्रा, खोके तसेच कंटेनर , बॉटलींग बॉल काढून टकाण्याचे तसेच त्या ठिकाणी सुरु असलेले अनधिकृत गोकार्टींग व्यवसाय तातडीने तात्काळ बंद करावा असे म्हटले आहे . तसेच या जागेत विनापरवाना बांधकाम केले आहे. अनधिकृत विनापरवाना गोकार्टींगचा व्यवसाय केल्याने अनधिकृत बिनशेती दंडाची रक्कम भरावी असे ही आदेशात म्हटले आहे.असे न केल्यास शासकीय खर्चाने बांधकाम काढण्यात येऊन जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसूल करण्यात येईल. तसेच या जागेत विनापरवाना बांधकाम केले असल्याने अनधिकृत बिनशेती दंडाची आकारणी भरावी असे स्पष्ट करण्यात आले आहे. हा आदेश मिळाल्या पासून एक महिन्याच्या आत हे थील बांधकाम स्वखर्चाने काढून घ्यावे अन्यथा शासकीय खर्चाने काढण्यात येऊन त्याचा होणारा खर्च वसूल करण्यात येईल, असे आदेश देण्यात आले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)