हॅरिकेनचा परिणाम; ह्युस्टनच्या पूरात 200 भारतीय अडकले

नवी दिल्ली- हॅरिकेन हार्वे चक्रिवादळामुळे अमेरिकेत ह्युस्टन भागामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे आलेल्या पूरामध्ये ह्युस्टन विद्यापिठात किमान 200 भारतीय विद्यार्थी अडकून पडले आहेत. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आज ही माहिती दिली.

या विद्यापिठामध्ये शिक्षण घेणारे शालिनी आणि निखील भाटिया या दोन विद्यार्थ्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. भारतीय दूतावासाच्यावतीने या विद्यार्थ्यांना मदत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पूरामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांबाबत अधिक तपशील अद्याप उपलब्ध झालेला नाही.

पूरामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत अन्नपदार्थ पोहोचवण्याचा प्रयत्न भारतीय दूतावासाच्यावतीने करण्यात आले. मात्र पूरामध्ये अडकलेल्यांच्या मदतीसाठी बोटींची आवश्‍यकता असल्याने अमेरिकेच्या कोस्ट गार्ड विभागाच्यावतीने त्यांना अटकाव करण्यात आला, असे स्वराज यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. हॉस्पिटलमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचता येईल, अशी व्यवस्था करण्यात येईल, असेही सुषमा स्वराज यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)