हॅन्डलिंग चार्जेस घेतल्यास वितरकांवर होणार कारवाई

हिंगोली – वाहन विक्री करताना वितरक हॅंडलिंग चार्जेस म्हणून ग्राहकांकडून अतिरिक्त रक्कम वसूल करतात त्याअनुषंगाने वाहनांच्या नोंदणीसाठी ग्राहकांकडून विहित शुल्का व्यतिरिक्त कोणतेही ज्यादा शुल्क न घेण्याबाबत परिपत्रकानुसार शासनाच्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत. त्यानुसार वाहनांच्या नोंदणीसाठी ग्राहकांकडून शुल्क आकारनी करतात यावर अनेक वर्तपत्रानी हे प्रकरण चव्हाटयावर आनले होते त्यावर उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पवार यांनी आज 29 नोव्हेबर रोजी अंमलबजावणीचे आदेश काढले आहेत.

नव्याने होणाऱ्या दुचाकी / चारचाकी वाहनांकरिता शासनाने वेळोवेळी विहित केलेले नोंदणी शुल्क व कर या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येऊ नये. वाहन नोंदणीसाठी शासनाने वेळोवेळी विहित केलेले नोंदणी शुल्क व कर याबाबतची माहिती प्रत्येक वितरकाने शोरुम मधील दर्शनी भागामध्ये प्रदर्शित करावे.

-Ads-

याबाबतीत आपली तक्रार संबंधित प्रादेशिक, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचेकडे लेखी, समक्ष, टपालाद्वारे, ई-मेलद्वारे किंवा या पोर्टलवर तक्रार दाखल करावी. तसेच आवश्‍यकता भासल्यास ग्राहक संरक्षण मंचाशी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. संबंधित वाहन वितरकांविरुध्द फौजदारी कारवाई करण्याचा इशारा हिंगोलीच्या उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)