हॅण्ड सॅनिटायझर वापरणे ठरू शकते धोकादायक

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांमध्ये हात धुण्यासाठी लिक्विड हॅण्ड सॅनिटायझरचा वापर कमालीचा वाढला आहे. त्यासाठी दुरचित्रवाणीवर हॅण्ड सॅनिटायझरच्या जाहीरातींचा मारादेखील तितकाच महत्वाचा भाग ठरत आहे. तरुणांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वच वयोगटातील व्यक्ती हात धुण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करताना दिसतात.परंतु, हे हॅण्ड सॅनिटायझर तुम्हाला फायदेशीर ठरण्यापेक्षा हानीकारक अधिक ठरु शकते…होय, हे खरे आहे एका नव्या संशोधनामध्ये याच्या वापराचा आरोग्यावर किती मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होवू शकतात याची माहिती देण्यात आली आहे.
या नव्या संशोधनानुसार, अलकोहोलयुक्त सॅनिटायझरचा वापर करण्याने मुलांना अनेक आजार संभवतात. यात प्रमुख्याने पोटदुखी, मळमळणे आणि ओमेटिंगसारखे त्रास मुलांना होऊ शकतात. तसेच याच्या अतिरिक्त वापरामुळे मुले कोमात जाण्याचा धोका अधिक संभवतो, असेही संशोधनकर्त्यांचे म्हणणे आहे. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल ऍन्ड प्रिव्हेंशनने (CDCP) यावर रिसर्च केले आहे. या संशोधनाअंती हॅण्ड सॅनिटायझरच्या संपर्कात मुलांना गंभीर आजार संभवतात, असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. या संशोधनासाठी अमेरिकेतल्या सीडीसी सेंटरने 2011 ते 2014 या काळात 12 वर्षापर्यंतच्या 70,669 मुलांचं निरिक्षण केलं. या निरिक्षणामध्ये 92 टक्के मुलं ही अल्कोहोलिक हॅण्ड सॅनिटायरचा वापर करतात, तर 8 टक्केच मुले ही अल्कोहोल विरहित सॅनिटायरचा वापर करत असल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये याच्या वापराचे दुष्परिणाम संभवत असल्याचे संशोधकांना आढळून आले आहे. त्यामुळे मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून अल्कोहोलिक उत्पादने मुलांना वापरासाठी देणे टाळावे, असा सल्ला संशोधकांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)